लायन्स क्लब ऑफ कामशेत यांच्या वतीने १४५ विदयार्थ्यांना मास्टर राजू अगरवाल यांनी दिले स्वरक्षणाचे धडे








मावळ मराठा न्युज – कामशेत, लायन्स क्लब ऑफ कामशेतने रविवार, ०७/१२/२०२५ रोजी कामशेत येथील महर्षि कर्वे आश्रम शाळेत इयत्ता ७ वी ते १० वी पर्यंतच्या १४५ आदिवासी मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन केले होते.मास्टर राजू अग्रवाल (७ वा डॅन इंटरनॅशनल ब्लॅक बेल्ट, १३ वा स्पोर्ट्स अवॉर्ड विजेता) यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे स्वसंरक्षण तंत्र शिकवण्यात आले, शस्त्रांशिवाय शत्रूशी लढणे आणि इतरांनाही वाचवणे.मास्टर राजू यांनी ताकद आणि निर्भयतेने कसे प्रहार करायचे हे शिकवले.हे तायक्वांदो प्रशिक्षण सर्व विद्यार्थ्यांना भविष्यात कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास सक्षम करेल असा या शिबिरामागील उद्देश होता.या कार्यक्रमाला अध्यक्षा ला. दीपाली ठोमरे, ला. आशा अग्रवाल, ला. सीमा गुंजाळ, ला. प्रताप गुंजाळ, प्राचार्य अनिता देवरे आणि अजित डुंबरे सर हे सर्व उपस्थित होते.



