अहिल्यानगर शहरामधील नालेगाव अमरधाम या स्मशानभूमीच्या प्रमुख प्रवेशद्वारा जवळ उड्डाणपूलाची निर्मिती करण्यात यावी-अशोक सब्बन,भारतीय जनसंसद

मावळ मराठा न्युज- अहिल्यानगर हे शहर भौगोलीक मर्यादेमुळे उत्तर दक्षिण विस्तारले आहे उत्तर दक्षिण वाहतूक मोठी असून जाण्या -येण्यासाठी मोठ्या रूंदीचा दिल्ली गट ते नविन टिळक रोड हा एकमेव रस्ता आहे त्यमुळे फार मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावर वाहतूक आहे त्या वाहतूकीला योग्य दिशा नसल्याने दिवसात अनेक वेळा वाहतूक कोंडी होत आहे कायम स्वरूपात दूर ती करण्याचा उपाय उड्डण पुल आहे. अहिल्यानगर शहराची लोकसंख्या सुमारे पाच लाख असून ती वाढतच आहे. मुख्य शहरात अमरधाम हि एकच स्मशानभूमी आहे. या ठिकाणी शहरातील सर्वच भागातील नागरिकांना अंत्यविधी व अंत्यविधी नंतरच्या इतर सर्व विधींसाठी या स्मशानभूमीत यावे लागते. दररोज सकाळी अनेक दशक्रिया विधी असतात तसेच अनेक अंत्यसंस्कार करण्यासाठी दररोज नागरिकांची मोठी गर्दी दिवसभर तर कधी रात्री उशिरापर्यंत असते या विधीसाठी अनेकंचे नातेवाईक, मित्र मंडळी बाहेर गावावरून उपस्थित राहण्यासाठी येतात.अशावेळी अमरधामच्या प्रमुख प्रवेश दरवाजा बाहेरून टिळक रोड ते नेप्ती, दिल्लीगेट कडे जाणारी व तयेणारी मोठी वाहतूक या रस्त्यावरून होत असते. येणाऱ्या अंत्ययात्रांना तसेच त्याच्या समावेत येणारे व स्वंतत्ररित्या येणारी महिला,मुले, वृध्द नागरीक, दुचाकी,चारचाकी वाहनावर येणारे नागरिकांना सदर रस्ता ओलांडून अमरधामच्या प्रवेशद्वाराकडे जावे लागते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर असलेल्या वाहतुकीमुळे प्रवेशद्वारातून रस्ता ओलांडून आत प्रवेश करण्यात अत्यंत जिकरीचे होते तसेच विधी आटपून बाहेर पडणाऱ्या नागरिकांना,वाहनांना रस्ता ओलांडून जाताना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. शोकाकुल मनस्थितीतील व भावनिक दुःखी असलेला वर्ग या ठिकाणावरून येत जात असतो. त्यांना रस्ता ओलांडून आत बाहेर जाणे अत्यंत त्रासदायक होते. दुःखी मनस्थितीत रस्ता ओलांडणे अवघड होते . वाहतुकीची कोंडी होते. रस्ता ओलांडता न येण्यामुळे अंत्यविधीला व इतर विधींना जाण्यास उशीर होतो व विधीसाठी वेळेत पोहोचता येत नाही .यामुळे नागरिकांमधे उद्घविग्नता निर्माण होते व धावपळ करीत पोहचण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याची शक्याता मोठ्या प्रमाणात असते .या सर्व बाबींचा विचार करता गर्दी टाळण्यासाठी अमरधाम स्मशान भूमीच्या प्रवेशद्वारा जवळ उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात यावी.हा उड्डन पुल नेप्ती चौकाच्या पुढे बागरोजा हडको पर्यत करण्यात यावा नेप्ती चौकात होणारी वाहतूकीची कोंडी दूर होईलअशी मागणी जिल्हाध्यक्ष सुधिर भद्रे, याच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली या शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष पोपटराव साठे,आर्किटेक्चर अर्षद शेख,सुनील टाकसाहेब,बाळासाहेब पालवे,राम धोत्रे,अशोक डाके,आकाश गायकवाड, राजेंद्र कर्डिले, निवृत्त अभियंता संजय शिंदे, रवी सातपुते, वीरबहादूर प्रजापती , केशव बरकते, वहीद सय्यद, बबलू खोसला, अशोक भोसले,विक्रम क्षीरसागर,फैरोज शेख,विजय शिरसाठ, नुरखां पठाण, कटारिया व जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी महानगरपालिका आयुक्त श्री.यशवंत डांगे यांचेकडे केली आहे . निवेदनाच्या प्रती नगर विकासमंत्री,जिल्हाधिकारी -अहिल्यानगर , व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे उप अभियंता यांना देण्यात आलेल्या आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page