लोणावळा शहरातील स्थानिक छोट्या व्यावसायिकांवर अतिक्रमणची कार्यवाही नको -कृष्णा साबळे

मावळ मराठा न्युज -लोणावळा,प्रतिनिधी, लोनावळा- खंडाळा शहरांमध्ये पर्यटक पर्यटनासाठी तसेच पावसाळ्यात सुरू होणाऱ्या धबधबे यांचा आनंद घेण्यासाठी येत असतात.त्यांच्या सेवेसाठी स्थानिक छोटे व्यावसायिक चहा, मकाकनिस, वडापाव, भजी या सारख्या छोठे व्यावसाय स्थानिक बेरोजगार युवक व माता भगिनी करित असतात.वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची ही ते काळजी घेतात, लोनावळा खंडाळा परिसरात इतर व्यावसाय उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात पर्यटकांची भूक भागवण्याचे काम छोटे व्यावसायिक करित असतात ही बाब मुख्यव्यवस्थापक लोनावळा नगरपरिषद अशोक साबळे यांच्या निदर्शनास आणून दिली.तसेच छोट्या बेरोजगार तरुणांनाच्या व्यावसायिकांवर अतिक्रमण कार्यवाही न करण्याची विनंती शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांच्या उपस्थितीत केली. यावेळी मावळ लोकसभा अध्यक्ष कृष्णा साबळे,मावळ लोकसभा महिला आघाडी अध्यक्षा भारती ताई चांदणे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page