सत्यसाई कार्तीक यांची धडाकेबाज कारवाई; ७५ लाखाचा मुद्देमालासह जुगार खेळणारे १० जण ताब्यात; त्यातील एकाकडून २० हजारांचे एम.डी.पावडर जप्त



मावळ मराठा न्युज :-लोणावळा, लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. श्री सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वेहेरगाव येथे एका घरामध्ये अवैधरित्या जुगार अड्डा सुरू आहे. त्यावरून सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यासाई कार्तीक यांनी दिनांक १२/०८/२०२४ रोजी रात्री त्यांचे पथकासह सापळा रचुन मौजे वेहेरगाव येथील श्री मडवी यांचे बंगल्यामध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये आरोपी इसम नामे१) राहुल भरत इंगुळकर, वय ३४ वर्षें , रा. वाकसई ग्रामपंचायत शेजारी ता. मावळ जि.पुणे २) संतोष ज्ञानदेव बोत्रे वय ३६ वर्षों रा. वेहेरगांव ता. मावळ जि पुणे ३) मंगेश विठ्ठल देशमुख वय ४६ वर्शे रा. वेहेरगांव ता. मावळ जि. पुणे. ४) संजय विठ्ठल देशमुख वय ४३ वर्षों रा. वेहेरगांव ता मावळ जि. पुणे. ५) दिनेश पांडूरंग गायकवाड वय ४० वर्ष रा. वेहेरगांव ता. मावळ जि. पुणे ६) चंद्रकांत हौजी देवकर वय ४२ वर्षों रा. वेहेरगांव ता. मावळ जि. पुणे. ७) विनोद शरद नाणेकर वय ४२ वर्षों रा. बेहेरगांव ता. मावळ जि. पुणे. ८ ) अजित सुनिल देवकर वय २९ वर्षों रा. वेहेरगांव ता. मावळा जि. पुणे. ९) मंगेश मारुती राणे वय ४० वर्षों रा. कामशेत शिवाजी चौक ता मावळ जि. पुणे १०) संतोष काशिराम दळवी वय ४५ वर्षों रा. बेहेरगांव ता. मावळ जि. पुणे हे पैशांवर तीन पत्ती नावाचा जुगार खेळताना मिळून आले. तसेच पंचासमक्ष पोलिसांनी वर नमूद आरोपींची झडती घेतली असता आरोपी नामे संतोष काशिराम दळवी वय ४५ वर्ष, रा बेहेरगांव ता. मावळ जि पुणे याने स्वतःचे पॅन्टचे खिशामध्ये २ .०३० ग्रॅम कि. वजनाचे व रु.२० ,३०० /- एवढ्या किमतीचे एम.डी पावडर हा नशाकारक अमली पदार्थ विक्रीकरिता बाळगल्याचे मिळुन आले आहे. सदरच्या कारवाईमध्ये वर नमुद सर्व आरोपींचे ताब्यातुन रोख रक्कम, वाहने व इतर साधने असा एकूण रु ७४ ,१४ ,०५० /- (अक्षरी चौऱ्ह्यातर लाख चौदा हजार पन्नास रुपये) एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदरबाबत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.न.२४९ /२०२४ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ५ . एन.डी.पी.एस. १९८५ चे कलम ८ (क) २१ (ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करत आहेत.सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक, सपोनि शेवते, पोसई शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.हवा अंकुश नायकुडे पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे, पो.कॉ मंगेश मारकड यांचे पथकाने केली आहे.




