कार्ला येथे इंद्रायणी नदी परिसरात स्वछता मोहीम


मावळ मराठा न्यूज़ कार्ला :- एक ऑक्टोबर,एक तास स्वच्छता मोहीम,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणुन पवित्र इंद्रायणी नदी परीसर स्वच्छ करण्यात आला .यावर्षीच्या पहील्या पाऊसात वाहुन आलेली जलपर्णी बंधाऱ्यावर घट्ट रोऊन बसली होती,ती जलपर्णी काढण्याचा संकल्प करुन,या स्वच्छता मोहीमेची सुरुवात करण्यात आली. स्वच्छता मोहीमे मध्ये पत्रकार मित्र सागर शिंदे यांनी हातभार लावत नदी परीसर स्वच्छते बद्दल समाधान व्यक्त केले. या स्वच्छता मोहीमेत भाऊसाहेब हुलावळे यांच्यासह प्रत्यक्ष सहभागी होऊन कार्ला ग्रामपंचायतीचे विधमान सदस्य सचिन हुलावळे,मावळ तालुका युवासेनाप्रमुख विशाल हुलावळे,युवा कार्येकर्ते माऊली हुलावळे यांनी मोलाचे योगदान दिले.




