पावसाळा सुरू होण्याअगोदर पुणे शहरातील रस्ते, खड्डे,औढे,नाले, आणि नद्यांची स्वच्छता करा-संभाजी ब्रिगेड

मावळ मराठा न्युज :-पुणे,पुणे शहरातील नद्या नाले आणि ओढ्यांची पावसाळा सुरू होण्याअगोदर तात्काळ स्वच्छता करा यासंदर्भात पुणे महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे महानगर अध्यक्ष अविनाश मोहिते म्हणाले पावसाळा सुरू होण्यासाठी एकच महिना कालावधी शिल्लक आहे.नंतर ओढे,नाले, आणि नदी यांची दुरुस्ती करता येत नाही.स्वच्छता करता येत नाही.यामध्ये साचलेला गाळ काढता येत नाही.म्हणून पावसाळ्या अगोदर यांची स्वच्छता करणे गरजेचे आहे.अजून पर्यंत महानगरपालिकेकडून गाळ काढण्यासंदर्भात किंवा ओढ्यांची स्वच्छता करण्यासंदर्भात कुठलीही उपाययोजना केलेली नाही.पर्वती या ठिकाणचा आंबील ओढा असेल किंवा भवानी पेठेतील टिंबर मार्केट मार्गे नाना पेठेतून जाणारा औंढा असेल,वडगाव बुद्रुक या ठिकाणचा आंबेगाव मधून येणारा नाला असेल अशा अनेक नाल्यांमध्ये प्लास्टिक किंवा इतर घनकचरा आणि गाळ मोठ्या प्रमाणात साचलेला आहे.जर पावसाचे प्रमाण वाढले तर या नाल्यांमधून या ओढ्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतो.आणि गटारांची सफाई नसल्यामुळे ओढ्यांची सफाई नसल्यामुळे नाल्यांची सफाई नसल्यामुळे लोकांच्या घरात पाणी घुसून अतोनात नुकसान होते.गाळ निर्मित पाणी घरामध्ये शिरते आणि गरिबांची धूळधाण उडते त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात डासांची निर्मिती होऊन अनेक संसर्गजन्य आजाराला गरिबांना सामोरे जावे लागते. सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरते.अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरते. मागील काही वर्षांपासून असे अनेक अनुभव पुण्यातील जनतेला आलेले आहेत.नंतर पश्चाताप करून काहीच उपयोग होत नाही म्हणून महानगरपालिकेने तात्काळ उपयोजना करावी. तसेच घरात पाणी घुसून अन्नधान्याची नासाडी होते.गाड्या वाहून जातात.घरांची पडझड होते.अशा पद्धतीचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात पुणेकरांना सोसावे लागते.आणि त्याची भरपाई महानगरपालिकेला भरावी लागते.म्हणून याची तात्काळ दखल घेऊन औढे,नाले,आणि नद्यांची,सफाई करावी. पुणे शहरातील रस्ते सुद्धा खड्डेमय झालेले आहेत या रस्त्यात वरती पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक लोकांना नाहक आपला जीव गमवावा लागतो म्हणून पावसाच्या अगोदर खड्ड्यांची व रस्त्याची सुद्धा दुरुस्ती झाली पाहिजे. अशी ही मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे करण्यात आली. महानगरपालिकेने जर याची दखल घेतली नाही किंवा तात्काळ नाले सफाई केली नाही. खड्ड्यांची व रस्त्याची दुरुस्ती केली नाही.तर संभाजी ब्रिगेड च्या वतीने महानगरपालिकेसमोर उग्र स्वरूपाची आंदोलने,निदर्शने, करण्यात येतील असे शहराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी आमच्या वार्ताहरची बोलताना सांगितले.यावेळी महानगराध्यक्ष अविनाश मोहिते.प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे.सचिव अर्जुन नागडे.कार्याध्यक्ष अविनाश घोडके.व्यंकट वानखेडे.मल्लेश मानपीडी. प्रशांत गाडे.आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page