लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश रामघरे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्वागत आणि शुभेच्छा





मावळ मराठा न्युज- लोणावळा,लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे नव्यानेच कार्यभार सांभाळणारे पोलीस निरीक्षक राजेश रामघरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे त्यांचे स्वागत आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष नासीर शेख,महिला अध्यक्ष श्वेता वर्तक प्रांतीय सदस्य बाळासाहेब पायगुडे, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश भटक्या विमुक्त जाती विमुक्त जाती चे दत्ता गोसावी,उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रफुल राजपूत,उपाध्यक्ष सुधीर कदम आदी मान्यवर उपस्थित होते.




