लोणावळा नगरपरिषद प्रशासनाचा मनमानी कारभाराची हद्द अनधिकृत पद्धतीने पुरंदरे मैदान खोदले म्हणून स्पर्धाच पार रद्द



मावळ मराठा न्युज:- लोणावळा, लोणावळा नगरपरिषदेच्या ताब्यातील पुरंदरे मैदान (हुडको) हे वारंवार भाड्याने देण्यात येते. येथे काही दिवसांपूर्वी एक महिण्यासाठी ‘आनंद मेळा’ झाला होता. त्यानंतर आता सद्य परिस्थिती मधे पूर्ण मैदान हे नगरपरिषद प्रशासनाने भाड्याने दिलेले असून त्या मैदानावर मोठ्या प्रमाणात खोदकाम केलेले दिसून येत आहे. संबंधित मैदान हे लोणावळा शहरातील सर्व युवकांसाठी व पुरंदरे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खेळासाठी वापरले जाते. नगरपालिका प्रशासन महिनोंमहिने हे मैदान त्रयस्थ व्यक्तिंना भाड्याने दिल्यामुळे मैदानाचे आतोनात नुकसान होत आहे सोबतच मुलांना खेळण्यासाठी ते उपलब्ध देखील होत नाही.सध्या या मैदानावर ज्या पद्धतीने खोदकाम करण्यात आले आहे त्यामुळे या मैदानाचा नैसर्गिक कठीणपणा जाऊन येत्या पावसाळयात या मैदानावर मोठे खड्डे होणार असून मैदान यापुढे क्रिडा स्पर्धासाठी वापरण्यास योग्य राहणार नाही.तरी संबंधित व्यक्तिंना मैदान भाड्याने देताना नगरपालिका प्रशासनाने त्यांना खोदकामाची परवानगी दिली होती का? आणि दिली असल्यास कोणत्या नियमानुसार दिली होती? व सदर परवानगी दिली नसल्यास संबंधितांवर प्रशासन काय कारवाई करणार आहे ? याचे उत्तर लोणावळेकर नागरिकांना नगरपालिका प्रशासनाकडून मिळणे अपेक्षित आहे.याविषयी लोणावळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांची भेट घेऊन सदर विषयाबाबत जाब विचारण्यात आला.




