शिवसेना वर्धापनदिन निमित्त स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण





मावळ मराठा न्युज -लोणावळा,जगप्रसिद्ध लायन पॉईंट,टायगर पॉईंट स्वच्छता अभियान वृक्षारोपण शिवसेना वर्धापन दिनाच्या अनुषंगाने जगप्रसिद्ध असलेल्या पुणे जिल्ह्यातील मावळ लोणावळा येथील लाईन पॉईंट टायगर पॉईंट स्वच्छता करण्यात आली.प्रतिवर्षीप्रमाणे भरपूर पाऊस ढगाळ वातावरण असताना सुद्धा आज मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान करून वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे,सदानंद पिलाने, माजी उपसरपंच श्यामबाबू वाल्मिकी,वाहतूक सेनेचे दिनेश वीर,सुनील इंगोळकर,महेश खराडे,भीमा शिंगाडे,योगेश येवले,सुनील कदम,अंकुश खरात,सीमा ताई चौबे,रोहित आखाडे, दत्ता आखाडे,संतोष शेडगे,सनी साळुंखे,संदीप मरगळे,सतीश गोमते,विजय चौरे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पुरुष व महिला शिवसैनिक दुकानदार स्थानिक नागरिक उपस्थित होते.




