४ जुलैला साज पुणे प्रस्तुत “ये इश्क नहीं आसां”उर्दू गजलांची मैफल

मावळ मराठा न्युज :-पिंपरी, (प्रदीप गांधलीकर) दिनांक : ०१ जुलै २०२४ साज पुणे प्रस्तुत “ये इश्क नहीं आसां” ही उर्दू गजलांची मैफल, गुरुवार, दिनांक ४ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह (छोटे सभागृह), निगडी प्राधिकरण येथे संपन्न होणार आहे. साज पुणे ही संस्था गेली १२ वर्षे सातत्याने गजलचा प्रसार आणि लोकप्रियता वाढावी म्हणून उर्दू, हिंदी, मराठी गजलांचे अनेक वेगवेगळे कार्यक्रम करीत आहे. या संस्थेच्या डॉ. शशिकला शिरगोपीकर, कुमार करंदीकर, श्रुती करंदीकर आणि गायत्री सप्रे – ढवळे, हे सर्व प्रथितयश गायक कलाकार हा कार्यक्रम सादर करणार आहेत. उर्दू गजल पारंपरिक रिवायती पद्धतीने सादर करण्यामध्ये या सर्व गजल गायकांचा हातखंडा आहे. रसिकांनी गौरवलेल्या “ये इश्क नही आसां” या कार्यक्रमाचे आतापर्यंत १०० हून अधिक प्रयोग झाले असून पिंपरी – चिंचवड परिसरात पहिल्यांदाच हा कार्यक्रम सादर होत आहे. आवर्जून ऐकायलाच हवा असा हा कार्यक्रम गजलरसिकांसाठी ही एक सांगीतिक पर्वणी ठरणार आहे.अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९४२०३२२७६९ वर संपर्क साधावा.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page