*लोणावळा शहरातील खड्डे त्वरित बुजवा व पाणी पुरवठा पुरेशा दाबाने व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालिकेला निवेदन*






मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा नगरपालिका क्षेत्रातील नागरीकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत आहे कि, शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरीकांच्या दैनंदिन प्रवासाला अडथळा येत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. विशेषतः पावसाळ्या काळात हे खड्डे पाण्याखाली लपले जात असल्यामुळे वाहनचालकांसाठी ते अधिक धोकादायक ठरत आहे. तसेच शहरातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अत्यंत कमी दाबाने व अल्पवेळेसाठी होत आहे. परिणामी,नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. यामुळे नागरकिांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून लोणावळा नगरपरिषदेने या समस्यांकडे तातडीने आणि गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. निवेदन देतेवेळी अध्यक्ष,नासीर शेख,महिला अध्यक्ष श्वेता वर्तक ,कार्याध्यक्ष, संतोष कचरे, जिल्हा युवक उपाध्यक्ष,प्रफुल राजपूत,विद्यार्थी सेल अध्यक्ष,अभय परदेशी ,ज्येष्ठ नेते,रमेश भाऊ दळवी ,तालुका उपाध्यक्ष,शेखर वर्तक ,उपाध्यक्ष,सुधीर कदम ,कार्याध्यक्ष तालुका सांस्कृतिक सेल,रमेश गोदिया,अब्दुल अजीज तांबोली आदी मान्यवर उपस्थित होते.



