ओवळे गावचे सामाजिक कार्यकर्ते शिवभक्त अजित शिंदे यांनी मानले गावकऱ्यांच्या वतीने सरपंच दिलिप नाना शिंदे यांचे आभार

मावळ मराठा न्युज -ओवळे, मावळ श्री.दत्ताभाऊ खोंडगे यांच्या घरापासुन ते शिवभक्त अजित भाऊ शिंदे यांच्या घराकडे जाणार्या रस्त्याचे काम पावसाळ्यापुर्वी पुर्ण झाले पाहिजे.कारण पावसाळ्यात येथील स्थानिक नागरिकांना आपल्या घराकडे जाताना पक्का रस्ता उपलब्ध नसल्याने खुप त्रास होतो.व पावसाळ्यात नागरिकांचे रस्त्याअभावी खुप हाल होत आहेत.त्यामुळे आपण लवकर ह्या रस्त्याचे काम पुर्ण करावे.अशीअशी शिवभक्त अजित शिंदे यांची ग्रामपंचायतीकडे मागणी होती. व पावसाळ्यापुर्वी ह्या रस्त्याचे काम पुर्ण होईल असे गावचे सरपंच-श्री.दिलिपनाना शिंदे व ग्रा.पदाधिकार्यांचा शब्द होता.ह्यासाठी ओवळे ग्रामपंचायतीने ह्या रस्त्याचे काम पावसाळ्यापुर्वी पुर्ण व्हावे,म्हणुन पाऊस चालु असताना देखील पावसात ह्या रस्त्याचे काम चालु ठेवुन पुर्ण केले.त्याबद्दल शिवभक्त अजित शिंदे यांनी ओवळे ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व ग्रा.पदाधिकार्यांचे आभार मानले.तसेच ह्या रस्त्यासाठी ज्या शेतकर्यांनी आपली जागा दिली.त्या शेतकर्यांचे देखील आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page