एकेरी वाहतुक आदेशाचे उल्लघंन करणा-या १६० वाहन चालकांवर लोणावळा शहर पोलीस स्टेशन कडुन कारवाई

मावळ मराठा न्युज:- लोणावळा,लोणावळा शहरात वाहतुक सुरळीत चालण्यासाठी लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने छ. शिवाजी महाराज चौक ते इंद्रायणी पुल ते रानडे हॉस्पीटल अशी एकेरी वाहतुकीचे नियमन करुन त्याबाबत ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आलेले असतानाही वाहन चालक हे वारंवार सदरहु आदेशाचा भंग करुन एकेरी मार्गाचे उल्लघंन करत असल्याचे निदर्शनास येत असल्याने आज रोजी विशेष मोहिम राबवुन एकेरी मार्गाचे उल्लघंन करणा-या एकुण १६० मोटार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.लोणावळा शहर पोलीस ठाण्यातर्फे वाहन चालकांना सदर एकेरी मार्गाच्या आदेशाचे पालन करणे बाबत आवाहन करण्यात येत आहे. अशी माहिती लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुहास जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page