“घर घर संविधान” मोहीमेतंर्गत लोणावळा नगरपरिषदेमार्फत सर्व विदयार्थ्‍याना भारतीय संविधान उद्देशिकेची फ्रेम वाटप

मावळ मराठा न्यूज- लोणावळा, भारतीय संविधान अमृत महोत्‍सवी वर्षात मा.महाराष्‍ट्र शासनाचे “घर घर संविधान” मोहीमेतंर्गत लोणावळा नगरपरिषदेमार्फत लोणावळा नगरपरिषदेच्‍या शाळातील सर्व विदयार्थ्‍याना भारतीय संविधानाची उद्देशिकेची फ्रेम वितरीत करण्‍याचा कार्यक्रम गुरुवार दिनांक २६ जून २०२५ रोजी भारतरत्‍न डॉ.बाबसाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा क्र.१ येथे आयोजीत करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन लोणावळा नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी श्री.अशोक साबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्‍तविक शिक्षक श्री.अमोल साबळे यांनी केले. या कार्यक्रमास मार्गदर्शन लोणावळा नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी श्री.अशोक साबळे यांनी केले. मार्गदर्शन करताना मुख्‍याधिकारी साबळे यांनी या कार्यक्रमाची माहिती तसेच घटनेतील महत्‍वाची बाबी विषयी विदयार्थ्‍याना माहिती दिली. उपस्थित सर्व विदयार्थ्‍यांना भारतीय संविधानाची उद्देशिकेची फ्रेम वितरीत करण्‍यात आली. त्‍यानंतर नगरपरिषदेच्‍या सर्व शाळांतील मुख्‍याध्‍यापकांना भारतीय संविधानाची प्रत देण्‍यात आली. याप्रसंगी नगरपरिषदेचे उपमुख्‍याधिकारी श्री.शरद कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी श्री.संतोष खाडे तसेच नगरपरिषदेचे इतर अधिकारी व कर्मचारी वृंद, पत्रकार बंधू उपस्थित होते. तसेच नगरपरिषद शाळांतील चित्रा जोशी, प्रतिभा दरेकर, लतिफ खान, भागवत सर, ज्‍योती चव्‍हाण,नंदा तादळे, सविता शिंदे, संतोष जगताप, सुचेता ऐखे, अमोल साबळे, शितल बच्‍छाव, रेखा ओव्‍हाळ, ज्‍योती पालवे इ. मुख्‍याध्‍यापक व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थितांचे आभार मुख्‍याध्‍यापिका प्रतिभा दरेकर यांनी मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page