लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेचे श्री सुबोध तिवारी यांनी नुकतीच भारताचे उपराष्ट्रपती श्री सी.पी.राधाकृष्णन यांची नवी दिल्ली येथे घेतली भेट

मावळ मराठा न्युज नेटवर्क -जागतिक ख्याती असलेल्या लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि इंडियन योग असोशिएशनचे सरचिटणीस श्री सुबोध तिवारी यांनी माजी कॅबिनेट मंत्री आणि कैवल्यधाम ग्लोबलचे अध्यक्ष श्री सुरेश प्रभू यांच्या समवेत नुकतीच भारताचे माननीय उपराष्ट्रपती श्री सी.पी. राधाकृष्णन यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि त्यांना शाल आणि “इंडियन योग असोशियनचे कॉफी टेबल बुक भेट देऊन सन्मानित केले.भारताच्या माननीय उपराष्ट्रपतींची भेट घेऊन आनंद झाला असे श्री सुबोध तिवारी म्हणाले. या भेटी दरम्यान त्यांनी लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेला भेट देण्याचे निमंत्रण दिले तसेच त्यांना येत्या सप्टेंबर महिन्यात साज-या होणाऱ्या कैवल्यधाम योग संस्थेच्या गोर्धनदास सेक्सरिया योग महाविद्यालयाच्या अमृत महोत्सव सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page