मराठी माणसांनो कुंभकर्णाच्या झोपेतून तुम्ही कधी जागे व्हाल ??



मावळ मराठा न्युज :-मावळ, १० जानेवारीचा शिवसेने संदर्भातला निकाल हा सांगितल्याप्रमाणे केवळ शिवसेना आणि लोकशाहीपुरता मर्यादित नाही. त्याला इतक्या विविध झालरी आहेत की त्याची कल्पना देखील तुम्हाला नाही. तुम्हाला मी काय सांगू इच्छितो हे समजेल की नाही याची देखील कल्पना नाही. परंतु अत्यंत कटू सत्य आज तुम्हाला सांगू इच्छितो.मुंबई महाराष्ट्र काबिज करण्यासाठी गुजराती लॉबी अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होती. मुंबईचे वैभव, मुंबईची श्रीमंती, मुंबई ही आर्थिक राजधानी, मुंबईत वसलेला व्यापार, मुंबईतले बॉलिवूड हे सर्व डोळ्यात अक्षरशः खुपत होते. पण मुंबई काबीज करण्याचे मनसुबे पूर्ण होणे कठीण होते कारण शिवसेना नावाची मराठी संघटना आणि ठाकरेंची मुंबईवर असलेली पकड हे अडथळे होते. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यावर भाजपने थोडे पंख पसरायला सुरवात केले. २०१४ मधे मोदी सरकार आल्यावर तर त्यांनी शिवसेना खतम करो असा फर्मानच काढला. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली मोदी लाटेत त्यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर आल्या, पण सरकार स्थापन होईल इतके बहुमत त्यांच्याकडे नव्हते मग सुरवातीला राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आणि मग उद्धव ठाकरेंची मनधरणी करुन सरकार स्थिर करुन घेतले. २०१४ ते २०१९ शिवसेनेच्या टेकूवर सत्तेत राहिले, सत्तेच्या माध्यमातून हातपाय पसरले, संघटना मजबूत केली आणि पुन्हा २०१९ ला सत्तेत येण्यासाठी शिवसेनेसोबत युती केली.अमित शाह चपला झिजवत मातोश्रीला आले मनधरणी करून शिवसेनेशी युती केली. बाळासाहेबांच्या खोलीत समसमान सत्तावाटप आणि जागावाटप निश्चित केले. प्रेस मधे देखील फडणवीसने तसे सांगितले आणि निकाल लागल्यावर मात्र पलटी मारली. शिवसेना ऐकत नाही म्हटल्यावर अजित पवारांना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार बनवले ते काही तास फक्त चालले. मग उद्धव ठाकरेंनी देखील काँग्रेस राष्ट्रवादीची मोठ बांधून सरकार स्थापन केले. त्यानंतर कोरोना काळात ठाकरेंच्या कार्याची तारीफ जगभर झाली. केंद्राकडून ठाकरेंना मुख्यमंत्री असतांना खूप त्रास देण्याचे प्रयत्न झाले. भाजपने हे हेरले की ठाकरे प्रचंड लोकप्रिय होत आहेत, त्यांचे काम असेच सुरू राहिले तर भाजपला पुढल्या निवडणुकीत खूप त्रास होईल. त्यांनी शिवसेनेतल्या सूर्याजी पिसाळांच्या गद्दार अवलादी शोधून काढल्या आणि खोक्याच्या, इ.डी, सीबीआय च्या जोरावर आमदार खासदार पळवले आणि ठाकरेंचे सरकार पाडले. त्यामुळे जनतेत प्रचंड सहानुभूतीची लाट ठाकरें साठी तय्यार झाली. हळू हळू भाजपने ठाकरेंन विरोधात खोटे आरोप, बातम्या आणि वाचाळ प्रवक्त्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन पोलिसांचे प्रोटेक्शन देऊन भुंकण्याची सुपारीच दिली, काहीही खोटे नाटे बेछूट आरोप करुन त्याची चर्चा करत राहायची. खोटं बोला रेटून बोला प्रमाणे बोलत रहायचं.दुसऱ्या बाजूला शिंदे यांना मुख्यमंत्री करुन बाहुल्यासारखे रिमोट कंट्रोलवर चालवले. उद्धव यांच्या वडलांचा घामाने तयार केलेला शिवसेना पक्ष आणि चिन्हं निवडणूक आयोगाशी सेटिंग करून काढून घेतले. लोक फोडायला पैशांचा पाऊस पाडला. ठाकरेंना कमजोर करण्यासाठी भाजप सर्वात खालच्या थराला गेली. त्याच सोबत महाराष्ट्रातले १० मोठे प्रकल्प गुजरातला गेले, हिरा बाजाराचे प्रमुख कार्यालय गुजरातला गेले, लाखो मराठी तरुणांचा रोजगार गुजरातला पाठवला. एका बाजूला हे सर्व करत राहायचे, पण मराठी माणसाच्या डोक्यात नक्की काय सुरु आहे ही कल्पना येण्या अगोदर भाजपच्या बोगस हिंदुत्वाचे आणि राम मंदिराचा विषय डोक्यात टाकून त्याला भावनिक करायचे.मराठी माणसाला समजतच नाही त्याच्या हातून काय काय चाललंय ते. उद्योग गेले, मोठं मोठी कार्यालय जातायत, तुमच्या संगठना फोडतायत, एकजूट फोडतायत. पण तुम्ही मशगूल आहात भाजपने तय्यार केलेल्या हिंदुत्वाच्या बोगस मृगजळात. प्रादेशिक अस्मिता धुळीस मिळवतायत तुमच्या, पण आपण या सर्व वस्तुस्थिती पासून वेगळ्याच धुंदीत आहोत. राजकीय मतभेद असू शकतात शिवसेना आणि ठाकरेंशी, पण विरोधकही मान्य करतील की शिवसेना आणि ठाकरे हेच मराठी माणसाची शेवटची आशा आहेत. ती कमजोर झाली की मराठी माणसाची शक्ती संपली. भाजप हा महाविशारी साप आहे. हिंदुत्वाचे खोटे मुखवटे घालून लोकांना मूर्ख बनवायचे आणि प्रादेशिक पक्ष संपवायचे हे त्यांचे कारस्थान. दक्षिणे तिकडच्या लोकांनी भाजपला अक्षरशः लाथ मारली, तिकडे नो एंट्री. वास्तविक तिकडची लोक ही कडवट आणि कट्टर हिंदू आहेत. त्यांच्या मंदिरात पूजा अत्यंत कडक शिस्तीत होते. पण त्यांनी भाजपच्या मुखवटेवाल्या हिंदुत्वाला तिथे बिलकुल स्थान नाही. प्रादेशिक अस्मितेला सर्वाधिक प्राधान्य ते देतात आणि म्हणून त्यांची एकी टिकून आहे. दंगलीत लपून बसलेली भाजप आज शिवसेने सारख्या २४ कॅरेट हिंदुत्व असणाऱ्या पक्षाला हिंदुत्व शिकवते हेच हास्यास्पद आहे. राम मंदिराचे वातावरण तयार करून, तुम्हाला भ्रमित करुन त्या लाटेत पुन्हा निवडून यायचे आणि आयसीयूत अंतिम श्वास मोजणाऱ्या लोकशाहीला अग्नी देण्याचे फक्त भाजपने बाकी ठेवले आहे. कुंभकर्णाच्या झोपेतून खडबडून जागे व्हा.असं अहवान शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी केले. तसेच दाखले म्हणाले मराठी माणसांनो, एकत्र या अन्यथा महाराष्ट्र आणि मराठी माणूस भाजप नावालाही शिल्लक ठेवणार नाही.




