डॉ.बी.एन.पुरंदरे बहुविध विद्यालय लोणावळा येथे “छात्रसमिती अध्यक्ष व उपाध्यक्ष सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ संपन्न







मावळ मराठा न्युज -लोणावळा, शनिवार,१२ जुलै २०२५ रोजी विद्यालयात सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता छात्रसमिती अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक शासकीय निवडणुकांप्रमाणे पार पडली. सदर निवडणुकीस विद्यालयातील छात्रसमिती अध्यक्ष पदासाठी इयत्ता नववी मधून सहा उमेदवार तर उपाध्यक्ष पदासाठी इयत्ता सातवी मधून तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. निवडणुकीमध्ये मतदार म्हणून विद्यालयातील 500 विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. छात्रसमिती अध्यक्ष म्हणून कु. पौर्णिमा विलास शेलार तर छात्र समिती उपाध्यक्ष म्हणून इयत्ता सातवी मधून चैतन्य संदीप मोहोळ हे विद्यार्थी विजयी झाले. सदर निवडणूक प्रक्रिया विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. यशवंत बारवकर सर व पर्यवेक्षक श्री. ज्ञानेश्वर रणपिसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली छात्रसमिती प्रमुख श्री. संदीप क्षीरसागर सर व छात्रसमिती उपप्रमुख सौ. मंजुश्री इकारी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना विद्यालयाच्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. आनंद गावडे सर यांनी विद्यार्थ्यांनी अनुभवलेल्या निवडणूक प्रक्रियेचे महत्त्व सांगताना भविष्यात मतदार म्हणून विद्यार्थ्यांचे महत्त्व काय असेल हे विशद केले. सदर निवडणूक प्रक्रियेत विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.




