तळेगाव येथील तायव्कांदो क्लास मधील १४ विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट प्रमाणपत्र



मावळ मराठा न्यूज- तळेगाव, कोरीयन तायक्वांडो ऑफ इंडिया चे मास्टर राजु पी. अगरवाल आंतरराष्ट्रीय ६ वे डॅन ब्लॅक बेल्ट यांच्या व्दारा यशंवतनगर येथे तायव्कांदो क्लास मधील १४ विद्यार्थ्यांना जगप्रसिद्ध वर्ल्ड तायव्कांदो फेडरेशन दक्षिण कोरीया येथुन आलेले आंतरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट प्रमाणपत्र कोरीयन तायव्कांदो अॅकडमी ऑफ इंडीया चे मास्टर राजु अगरवाल यांच्या हस्ते देण्यात आले. गेली ३५ वर्षा पासुन तळेगाव येथे अविरतपणे तायव्कांदो प्रशिक्षण वर्ग चालु आहे. मास्टर राजु अगरवाल यांचे काही विद्यार्थी डॉक्टर, नेव्ही, पोलीस प्रशासन इ. पदावर कार्यरत आहे. मास्टर राजु अगरवाल यांच्या हस्ते देण्यात आलेले आंतरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट धारक ३ डॅन ब्लॅक बेल्ट – वरुण दत्तात्रय गोपाळघरे,२ डॅन ब्लॅक बेल्ट – अक्षय अजय उडपी, नक्ष जयस राठोड,डॉ. दत्तात्रय वि. गोपाळघरे,१ डॅन ब्लॅक बेल्ट- नव्या धनाजी थोरात, अतुल्य संतोष नागरगोजे, निता पंकज कारखानिस, सौरभ प्रदिप शिनतरे, शौर्य ज्ञानेश्वर घाटकर, अरुष प्रशांत मानगावे, उत्कर्ष अभिजीत फलटणे, भक्ती भरत बनसोडे, अमोघ स्वप्निल जळगावकर,सुमन सुधाकरन कोणार या १४ विद्यार्थ्यांनी तायव्कांदो या आर्ट मध्ये प्रावीन्य मिळवले आहे.मावळ मराठा न्युज च्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि सलग ३५ वर्षे मावळ तालुक्यात एक उत्तम खेळाडू विद्यार्थ्यांना घडविण्याचे कामकरणाऱ्या मास्टर राजू आगरवाल यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.




