अंबादास कोरडे पाटील यांची प्रदेश कार्यकारणी अध्यक्षपदी नियुक्ती



मावळ मराठा न्यूज:- मुंबई, अंबादास कोरडे पाटील यांची प्रदेश कार्यकारणी अध्यक्षपदी नियुक्ती.महाराष्ट्रासह, देशाच्या १७ राज्यांमध्ये कार्यरत आणि केवळ शेतकरी हितासाठी कार्यरत असलेल्या बिगर राजकीय शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी समिती पदाधिकार्यांच्या नियुक्तया संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या आहेत. यामध्ये संघटनेचे जुने व अनुभवी जेष्ठ कार्यकर्ते माननीय श्री अंबादास माधवराव कोरडे पाटील नेवासा अहमदनगर यांची महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी, प्रदेश कार्यकारणी समितीच्या, “प्रदेशाध्यक्षपदी”नियुक्ती करण्यात आलेली आहे, यावेळी कोरडे पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत शुभेच्या देताना विठ्ठल पवार राजे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक.कोरडे पाटील यांची कार्यकारणी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याबरोबर माजी न्या. श्री. जी.डी. इनामदार साहेब यांची समितीच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी तर संघटनेचे जुने व अनुभवी ज्येष्ठ कार्यकर्ते सिद्धेश्वर आप्पा हेंबाडे मंगळवेढा सोलापूर यांची समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी तर संघटनेचे ज्येष्ठ नेते शामराव पवार म्हाळुंगे पडवळ राजगुरुनगर पुणे यांची समितीच्या कोषाध्यक्षपदी , डॉक्टर गजेंद्र पाटील जळगांव समितीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य, तर नामदेव जयाजी जाधव हिंगोली यांची प्रदेश कार्यकारणी समितीच्या सचिव पदी नियुक्ती, सह ११६ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती नियुक्त्या संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या राज्य कार्यकारिणी समितीमध्ये संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष शीलाताई मोहिते पाटील, उपाध्यक्ष संगीताताई पाटील यांचे सह २२ महिला पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच संघटनेचे सर्व प्रदेश पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी व सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष यांचे सह ११६ पदाधिकाऱ्यांच्या शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य कार्यकारणी समितीच्या कार्यकारणी समिती सदस्य पदी नियुक्ती करण्यात आलेलया आहेत. संघटनेच्या वतीने प्रदेश सचिव मालती पाटील, राष्ट्रीय सचिव इनुस आलम सिद्दिकी, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर महेंद्र काबरा, प्रदेश संघटक स्वातीताई कदम, यांचेकडून पत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय सचिव इनुस आलम सिद्दिकी, प्रदेश सचिव मालती पाटील, यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.




