मावळ तालुक्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आमदार सुनील शेळके यांचा सत्कार






मराठा न्युज नेटवर्क -मावळ,मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील आण्णा शेळके यांनी अधिवेशनामध्ये मावळ तालुक्यामधील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न मांडून पावसाळी अधिवेशनात लक्ष वेधी लावून कृतीम फुलांवरती बंदी घालण्यासाठी लक्षवेधी लावल्याबद्दल मावळ तालुका किसान सेल फुलोत्पादक सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आमदार सुनील आण्णा शेळके यांचा फुल गुच्छ देऊन व बळीराजाची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला. मावळ तालुक्यातील सर्व फुले उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मनन्यात आले. यावेळी नितीन जगतापरोशन पिंगळे,भिकाजी भागवत, गोपाळ पवळे, बुधाजी जागेश्वर,दिगंबर आगिवल,भारत आडीवळे,भास्कर लखीमले,वैभव पिंगळे,माऊली जाधव,सोमनाथ पाठारे,संचित पाठारे,समाधान पवळे,शंकर पवळे,बळीराम भोईरकर,सुभाष पिंगळे,जीवन कराळे,सुरेश जगताप,जालिंदर जोरी,गौरव शिंदे,विजय पिंगळेरोहित यादव,शुभम साठे, ऋषिकेश पाटील उपस्थित होते .




