ज्येष्ठ नागरिक संघाच्या खजिनदार संध्या गव्हले यांचा ७१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

मावळ मराठा न्युज – लोणावळा,११ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या खजिनदार संध्या गव्हले यांचा ७१ वा वाढदिवस उत्साहात साजरा केला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने रवींद्र कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवर, पाहुणे यांचे स्वागत केले.ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा मृदुला पाटील,सचिव प्रतीक्षा महाडीक,शारदा अगरवाल व संघातील भगिनिनी औक्षण केले. वाढदिवसानिमित्त गाण्यातून शुभेच्छा दिल्या. यावेळी केक कापण्यात आला. यां वळी सारेगामा क्लासेस चे सुनील कोपरकर, वीर सर, डॉक्टर अगरवाल,सूर साधनाचे संचालक प्रदिप वाडेकर, मेहता म्युझिकलचे राजेश मेहता,जेष्ठ नागरिक संघांचे माजी अध्यक्ष पांडुरंग तिखें, माजी खजिनदार गोरख चौधरी,रश्मी शिरस्कर, शत्रुघ्न खंडेलवाल, सत्यनारायण आगरवाल, भगवती प्रसाद,आदीमान्यवर मान्यवर बंधू भगिनी, सुन,नात व नातू मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या. आभार व्यक्त करण्याचे गोड काम उपाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी यांनी केले. अल्पोउपहाराचा सर्वांनी स्वाद घेतला. मावळ मराठा न्यूज परिवरच्या वतीने संध्या गव्हले यांना वाढदिवसाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page