सत्ताधारी मंत्र्यांची माजोरी कृत्याविरोधात मावळ तहसीलदार यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन






मावळ मराठा न्युज -वडगांव,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मावळ तालुक्याच्या वतिने मावळच्या तहसीलदारांना पत्रा द्वारे निवेदन देण्यात आले की राज्याचे कृषिमंत्री मानिकराव कोकाटे तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा वारसा याच्या विरुद्ध लांचनास्पद कृत्य विधानसभेत जंगली रम्मी जुगार खेळ व बार मालकी सह बार नृत्यांगणा त्याचा जाहीर निषेध करत त्यांचा राजीनामा घेऊन हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतिने करण्यात आली.तसेच लोकशाहीचं पवित्र मंदिर मानलं जाणाऱ्या “विधान भवनात” होणाऱ्या हाना-मारीचा देखील निषेध व्यक्त करण्यात आला. हे निवेदन देताना उपस्थित,पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक,शिवसेना भोसरी विधानासभा संघटक भारतदादा ठाकुर,मावळ तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे,युवा सेना मावळ तालुका अधिकारी उमेश गावडे, तालुका सल्लागार मारुतीभाऊ खोले, रमेश जाधव, तालुका संघटक शांताराम भोते, समन्वयक रवींद्र गायकवाड,बाळासाहेब शिंदे,वडगाव शहरप्रमुख राहुल नखाते,देहुरोड शहरप्रमुख-संदीप बालघरे, विभाग प्रमुख उमेश दहीभाते,भरत भोते ,उपविभाग भरत वाटाणे,राहुल दवणे,शाखाप्रमुख गोपीनाथ चोरगे, शंकर दळवी ,धीरज घारे ,संदीप ढोरे ,रामभाऊ कोकरे, यशवंत बोडके आदी आजी माझी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.




