लायन्स क्लब ऑफ तळेगाव,ढाकणे हॉस्पिटल आणि दानी आय क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिर








मावळ मराठा न्युज-तळेगाव,दिनांक ०३ .०१ .२०२६ रोजी लायन्स क्लब ऑफ तळेगाव, ढाकणे हॉस्पिटल आणि दानी आय क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले.”एकात्मिक बालविकास प्रकल्प पुणे विभाग तळेगाव दाभाडे” यांच्या अंतर्गत अंगणवाडी क्रमांक १८९ येथील अंगणवाडी सेविका व गरजू व्यक्तींसाठी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर हनुमान मंदिर म्हाळसकर वाडी भारत पेट्रोल पंपासमोर तळेगाव दाभाडे इथे आयोजित केले होते .त्यामध्ये ६७ व्यक्तींचे आरोग्य तपासणी व ५७ व्यक्तींची नेत्र तपासणी करण्यात आली.प्रभाग क्रमांक ८ मधील नवनिर्वाचित नगरसेविका मनिषा ताई म्हाळसकर या उपस्थित होत्या.लायन डॉ.ढाकणे,लायन डॉ.दाणी सर्व डॉक्टर,कर्मचारी व अंगणवाडी सेविका यांना सहकार्याबद्दल व उपस्थिती बद्दल लायन्स क्लब अध्यक्ष,लायन राजेंद्र झोरे तळेगाव यांनी सर्वाना धन्यवाद दिले.



