डॉ अविनाश वैद्य,सकीना बेदी यांचा गौरव, ३१० जणांचे रक्तदान



मावळ मराठा न्यूज:-पिंपरी(प्रतिनिधी) श्री शंकर महाराज सेवा मंडळचिंचवड आणि भोसरी येथील प्लेटमास्टर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरामध्ये ३१० जणांनी रक्तदान केले. रामेश्वर राठी,सूर्यकांत राठी, भगवान राठी, प्लेटमास्टर्सचे संचालक श्रीनिवास राठी, दिलीप राठी, तसेच टाटा मोटर्स, जेबीएम,सीएनएच,वाढोकर ग्रूप, पुणे इलेक्ट्रोप्लेटिंग असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम भोसरी एमआयडीसी मधील से. १० मध्ये संपन्न झाला.यावेळी श्री शंकर महाराज सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश वैद्य,जागृती अंध मुलींची शाळेच्या संचालिका सकीना बेदी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.प्लेट मास्टर्स उद्योग समूहातर्फे स्नेह सावली आपल घर वृद्धाश्रमातील २३ ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार केला.तसेच स्नेह सावली आपल घर वृद्धाश्रम आणि जागृती अंध मुलींच्या शाळेस काही मदत निधीचा धनादेश देण्यात आला. रक्तदान केल्याबद्दल ३१० रक्तदात्यांना भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी श्रीनिवास राठी म्हणाले कि,सामाजिक कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थाना मदत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. सामाजिक ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक कार्यात योगदान दिले पाहिजेत.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप जाधव,अर्चना वाशीकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना वाशीकर यांनी तर आभार सिध्दार्थ सेठिया यांनी मानले.




