अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन लोणावळा शाखाच्या वतीने पर्यावरण जागृती आणि शपथग्रहण सोहळा संपन्न

मावळ मराठा न्युज :-लोणावळा अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन लोणावळा शाखा यांच्यावतीने जेष्ठ नागरिक संघ विरंगुळा केंद्रात वाढत्या तापमानाच्या धोका पाहता पर्यावरण यावर जनजागृती करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पर्यावरण,पक्षी प्रेमी डॉ सीमा शिंदे आणि लोणावळ्याच्या माजी नगरसेविका ब्रिंदा गणांत्रा उपस्थित होत्या. यावेळी डॉ सीमा शिंदे यांनी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बद्दल माहिती दिली, वाढत्या तापमानमुळे माणसांची एवढी होरपळ होते तर पक्षी प्राणी यांची काय अवस्था असेल त्यासाठी त्याच्या संस्थे तर्फे पक्ष्याची घरटे आणि पिशव्या उपस्थितीना भेट देण्यात आल्या.यावेळी अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन लोणावळा शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यात अध्यक्ष म्हणून सौ संध्या सुनिल खण्डेलवाल. सचिवसौ अमृता लुनावत,कोषाध्यक्ष,लता गुप्ता, पर्यावरण प्रमुख अनीता खण्डेलवाल, नेत्रदान अंगदान प्रमुख, सौ स्वाती खण्डेलवाल, रक्त, त्वचा, देहदान सौ संगीता भुरट,महिला सशक्तिकरण,सौ पार्वती सोहनराज रावल, बाल विकास सौ विजया गुप्ता,जनसंपर्क: सौ पिंकी अमोल अग्रवाल,संस्कार संकृति साहित्य,शशि ध्रुव अग्रवाल, संबंध समन्वय: सौ कीर्ति गुप्ता, तकनीकी,प्रिया संजय रावल, समिति सशक्तिकरण, सौ राजश्री गिरीश खण्डेलवाल, सलाहकार, संगीता भुरट. साधना देवेन्द्र टाटिया यांची सर्वनुमते नियुक्ती करण्यात आली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page