कवी रमाकांत श्रीखंडे लिखित “स्वांत: सुखाय” काव्य संग्रहाचे प्रकाशन संपन्न




मावळ मराठा न्युज -प्राधिकरण, निगडी- दिनांक – १२.०५.२५ रोजी , कॅप्टन कदम हॉल सावरकर सदन येथे श्री रमाकांत श्रीखंडे यांच्या “स्वांत :सुखाय” या काव्य संग्रहाचे प्रकाशन म.सा.प. पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजनजी लाखे यांच्या शुभ हस्ते झाले. गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्राचार्य मुकुंदराव दातार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात.श्री लाखे यांनी निवडक कवितांचे मार्मिक रसग्रहण केले .डॉ दातार यांनी आपल्या रसाळ ओघवत्या शब्दात काव्याचे महत्व सांगितले. रसिकांनी पण मनमुराद दाद दिली.या कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. विनिता श्रीखंडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली .




