निगडी ते पिंपरी सुरक्षेतेची साधने न वापरता मेट्रोचे काम करणाऱ्या ठेकेदारावरती तात्काळ कायदेशीर कारवाई करून ठेका रद्द करा- लोकसेवक युवराज दाखले
मावळ मराठा न्युज -पिंपरी,प्रतिनीधी,पिंपरी – निगडी मेट्रो मार्गाचे काम अतिशय जलद गतीने चालू आहे ,परंतु संबंधित काम करणारा ठेकेदार हा कामगारांच्या जीवीतासी खेळत असल्याचं दिसुन येत आहे.सिव्हील वर्क मध्ये काम करत असताना कोणत्याही प्रकारची सुरक्षतेची साधने वापरत नसल्याचं दिसून येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून एखाद्या कामगाराचा जीव जाऊ शकतो, संबंधित ठेकेदारावरती तात्काळ आपण कायदेशीर कारवाई करून ठेका रद्द करण्याची मागणी मेट्रोचे मुख्य व्यवस्थापक श्रावण हर्डीकर यांच्याकडे शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे.तसेच कामगारांच्या हितासाठी आंदोलनाचा अस्त्र उगराव लागेल या कामी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी आपली व आपल्या प्रशासनाची राहील असा इशारा दाखले यांनी मेट्रो प्रशासनाला दिला आहे.