आपला परिवार व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पवना नदीकाठी महास्वच्छता अभियान

मावळ मराठा न्युज- पिंपरी,आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार दिनांक १/०६/२०२५ रोजी महास्वच्छता अभियान -२५ हा उपक्रम चिंचवड दशक्रिया घाट आणि परिसर येथे संपन्न झाला.आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे ही संस्था सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत.आपण ह्या समाजात राहतो त्या समाज्याचे आपल्यावर असलेले ऋण फेडण्यासाठी १०८ कुटुंब एकत्र येऊन ही संस्था स्थापन झाली आहे.प्रत्येक वर्षी मकरसंक्रांतला कौटुंबिक स्नेहमेळावा, प्लास्टिक मुक्त अभियान, ऊसतोडणी कामगारांना, वंचित घटकांना दिवाळी फराळाचे वाटप, गडकिल्ले स्वच्छता अभियान असे अनेक कार्यक्रम आयोजित करीत असुन ह्याचा एक भाग म्हणून आज चिंचवड येथील दशक्रिया घाट, पवना नदी पात्र येथे महास्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रम २०० अधिक समविचारी मित्र संस्था आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात स्वच्छता विषयीची प्रतिज्ञा म.न.पा.अधिकार्याच्या मार्फत घेऊन करण्यात आली.सदर कार्यक्रमामध्ये गुणवंत कामगार कल्याण मंडळ, मौलाना आझाद सोशल फाउंडेशन चर्होली,संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य,जुन्नर तालुका मित्र मंडळ,अलायन्स ग्रुप पिंपरी चिंचवड, रोटरी क्लब ऑफ डायनामिक भोसरी, नवचैतन्य हास्य क्लब दापोडी,अजिंक्य सोशल फाउंडेशन पुणे ,मराठा सेवा संघ पिंपरी चिंचवड ,चला मारू फेरफटका पुणे, पर्यावरण संरक्षण गती विधी पीसीएमसी ,गावित समाज विकास मंडळ पुणे,मानवी हक्क संरक्षण समिती पिंपरी चिंचवड ,हिंदू खाटीक चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थानी सक्रिय सहभाग नोंदविला.त्या शिवाय दानशूर नंदकुमार धुमाळ आणि बाळासाहेब साळुंखे यांनी रेनकोट आणि ग्लोज सफाई कामगारांना दिले. या प्रसंगी मा.नगरसेवक श्री राजाभाऊ गोलांडे व सुरेश भोईर उपस्थिती होते.महानगरपालिका पालिका आरोग्य निरीक्षक सौ.संतोषी पाटील कदम यांनी आपल्या मार्गदर्शनपर विचार मांडले…”आपल्या परिवारातील सर्व सदस्यांचे गोड कौतुक केले.आपण सर्व सदस्यांनी रविवार असून ही परफेक्ट वेळ नियोजन करुन प्रथम कामाला प्राधान्य देऊन मगच बाकी गोष्टींना महत्त्व देता हे खरोखरच कौतुकास्पद असून मी या सेवेत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि काटेकोर शिस्तबद्ध कार्यक्रम पहिलाच पाहिला आहे.या पुढे तुमच्या सर्व उपक्रमात सहभाग होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.या प्रसंगी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष श्री एस आर शिंदे यांनी संस्थेच्या वतीने वर्षीभरातील मकरसंक्रांत,स्वच्छता अभियान, वृक्षारोपण आणि एक हात मदतीचा या समाज दिशादर्शक उपक्रम उपक्रमाची माहिती देऊन जुलै मध्ये होणारा नियोजित वृक्षारोपण या विषयी सर्व सदस्यांना आव्हान केले.या प्रसंगी सफाई कर्मचार्याना यांचा संस्थेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन विषश सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर आज अनेक मान्यवराचे वाढदिवस ही गुलाब पुष्प देऊन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला…आपले शहर,स्मार्ट शहर,”आपले शहर,स्वच्छ शहर,आपली जबाबदारी” या घोषणा दिल्या गेल्या.या उपक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अनिल शर्मा, कार्याध्यक्ष किरण कांबळे, सेक्रेटरी अजित भालेराव, दत्ता बोराडे,विजय शिर्के,पराग खाडीलकर , गिरीश काटे,राजेश देशमुख, महमंदशरीफ मुलाणी,उल्हास तापकीर,सावळाराम भोर,करुना भालेकर,राधा मराठे यांनी विशेष सहकार्य केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page