ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल लोणावळा येथे भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा

मावळ मराठा न्युज – लोणावळा,ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल लोणावळा येथे भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी लोणावळा नगरपालिकेतील कर आणि प्रशासकीय अधिकारी मा. श्री मनोज वसंतराव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्वात प्रथम प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देऊन शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर शायनी अल्फोंस यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले, कार्यक्रमासाठी काही इटालियन पाहुणे देखील उपस्थित होते. विद्यार्थिनींनी त्यांच्या आपल्या देशाप्रती असलेल्या भावना विविध कार्यक्रमांद्‌वारे उत्कटतेने व्यक्त केल्या. यामध्ये प्रार्थना,भाषण,गीत गायन,नृत्य,स्केटिंग इत्यादींचा समावेश होता. वि‌द्यार्थिनींनी सादर केलेल्या कलागुणांमुळे सर्व उपस्थितांची मने देशप्रेमाने भारावून गेली. यावेळी विविध स्पर्धामध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये वि‌द्यार्थिनींना स्पर्धा परीक्षा तसेच प्रगत भारतासाठी आपले योगदान याविषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थिनीच्या उत्साहाचे व कार्यक्रमाचे देखील कौतुक केले. शाळेतील विद्यार्थिनी कु. अर्णवी लोहिरे हिने प्रमुख पाहुण्यांचे आणि शाळेतील सर्व शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थिनी यांचे आभार मानले. शेवटी ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page