केरळ येथे झालेल्या केरळ मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये लोणावळ्याच्या सौ.ज्योती कंधारे यांना तब्बल चार सुवर्णपदके

मावळ मराठा न्युज – लोणावळा,दिनांक २ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान कोझिकोड , केरळ येथे,केरळ पावरलिफ्टींग असो. आणि पावरलिफ्टींग इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये शिवदुर्ग फिटनेस,लोणावळा अर्थात महाराष्ट्राची सुवर्णकन्या सौ.ज्योती हिने एक दोन नाही तर तब्बल चार सुवर्णपदके जिंकली. त्याच प्रमाणे एक दोन नव्हे तर चक्क चार चार राष्ट्रीय विक्रम आपल्या तसेच महाराष्ट्राच्या नावावर कोरून ठेवले.ज्योती हिने हे राष्ट्रीय विक्रम वयाच्या ४५व्या वर्षी मास्टर्स १ वयोगटात ५२ किलो वजनी गटात स्क्वॅट मध्ये १३२ .५ किलो ,बेंच प्रेस मध्ये ८७ .५ किलो तर डेडलिफ्ट मध्ये १३७ .५ किलो असे एकूण ३५७ .५ किलो ईतके वजन उचलत प्रस्थापित केले. खूप खूप अभिनंदन आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा सौ.ज्योती गेली दहा वर्षे सातत्याने शिवदुर्ग र्फिटनेस,नांगरगाव, लोणावळा येथे, शिवदुर्ग मित्र चे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेते, राष्ट्रीय पंच अशोक मते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page