“एक वही मोलाची,”कंधारे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

मावळ मराठा न्युज -आंबवणे:- मुळशी तालुक्याचे माजी सभापती मा. रवींद्र राजाराम कंधारे उर्फ बाबासाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मुळशी तालुक्यातील धरण भागातील माध्यमिक शाळांना अठरा हजार वाह्यांचे वाटप करण्याचा मनोदय होता. त्या अनुषंगाने आज आंबवणे येथील सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालयात आज एक वही मोलाची हे महत्वाचे ब्रीद अधोरेखित करून धरण भागातील खऱ्या गरजू शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आला. या प्रसंगी स्वतः श्री कंधारे, लहूभाऊ वाळंज सरपंच वांद्रे, निलेश मेंगडे उपसरपंच आंबवणे, नारायण दळवी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, मेघाताई नेवासाकर ग्रामपंचायत सदस्यां, अक्षराताई दळवी ग्रामपंचायत सदस्या, उल्हासभाऊ मानकर उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,अतिशभाऊ मरे, विनायक तोंडे, सुनिलभाऊ बोडके, कुंभार मॅडम ग्रामसेवक आंबवणे, भटू देवरे मुख्याध्यापक मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाच्या वतीने बाबासाहेब यांचा व सर्व मान्यवरांचा शाळेत यथोचित सन्मान केला. बाबासाहेब यांनी आपल्या मनोगतात त्यांच्या कार्यकाळात केलेल्या उपक्रम व विकास कामांच्या आठवणींना उजाळा दिला. मुख्याध्यापक श्री देवरे यांनी प्रास्ताविक केले. श्री कुलथे यांनी सूत्रसंचालन केले. शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी प्रयत्न केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page