खंडाळा येथील प्राथमिक शाळा क्रमांक १० संत गाडगे महाराज विद्यालय या शाळेची दुरावस्था

मराठा न्युज -खंडाळा,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लोणावळा शहर यांच्या वतीने खंडाळा विभागात असलेली प्राथमिक शाळा क्रमांक १० संत गाडगे महाराज विद्यालय या संदर्भात लोणावळा नगरपरिषद मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.खरंतर काल दिनांक १९ जुन रोजी शिवसेना पक्षाच्या ५९ व्या वर्धापनादिनानीमीत्त या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप कार्यक्रम घेण्यात आला होता त्यावेळी शाळेची झालेली अवस्था उपस्थित शिवसेना पदाधिकारी यांनी पाहिली आणि शाळेतील मुख्याध्यापक यांच्या समवेत चर्चा केल्यानंतर आज लगेचच त्या संदर्भात लो.न.प. मुख्यअधिकारी यांची शिवसेनेच्या लोणावळा शहर पदाधिकारी यांनी भेट घेऊन निवेदन दिले.यावेळी पुणे जिल्हा महिला आघाडी सह-संपर्कप्रमुख श्रीमती शादान भाभी चौधरी, पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक, तालुका प्रमुख आशीष ठोंबरे, शिवसेना शहरप्रमुख परेश बडेकर, मा.नगरसेवक माणिक मराठे,समन्वयक जयवंत दळवी, सल्लागार रामभाऊ थरकुडे,मा.युवतीसेना अधीकारी सौ सना साळुंखे, प्रवक्ते अनिल कडू, विभाग प्रमुख रतन मराठे,कमर अन्सारी, शाखाप्रमुख जीतु ठोंबरे,रोमेल फर्नांडिस इ. पदाधिकारी शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page