मराठा आरक्षणासाठी मराठा गरजवंताचा लढा चलो मुंबई साठीच भगवं वादळ आज लोणावळ्यात घोंगावणार

मावळ मराठा न्युज- लोणावळा,मराठा समाजाला इतर मागास वर्गातून (ओबीसी) आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलक काल अंतरवाली सराटी येथून शहागड-पैठणमार्गे मुंबईच्या दिशेने निघाले. आरक्षणासाठी ही आरपारची लढाई सुरू झाली आहे. आता कोणत्याही प्रकारची माघार घेणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले आणि ते मुंबईच्या दिशेने निघाले. जागो जागी त्यांचे जंगी स्वागत होत आहे. आज सांयकाळी मनोज जरांगे यांच्या ताफा लोणावळ्यातून जाणार आहे यावेळी मराठा समाजाकडून त्यांचे जंगी स्वागत होणार आहे त्याची तयारी देखील झाली असून अक्खा मावळ तालुका जरांगे पाटील यांच्या चलो मुंबई या मराठा आरक्षणाचा आरपार च्या लढाई मध्ये सामील होतील.प्रचंड गर्दी आणि गाड्यांच्या ताफा लोणावळ्यातून जाणार असल्याने लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने देखील विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून शाळा लवकर सोडणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page