मनःशक्ती केंद्राच्या वतीने येलघोल शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप व आरोग्य तपासणी

मावळ मराठा न्युज – येलघोल, ता.मावळ (प्रतिनिधी) : मनःशक्ती केंद्र, लोणावळा यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, येलघोल (केंद्र-कडधे), ता. मावळ, जि. पुणे येथील इयत्ता पहिली ते सातवीतील सर्व विद्यार्थ्यांना सलग तीन शैक्षणिक वर्षे (२०२४-२५, २०२५-२६ व २०२६-२७) मोफत वह्यांचे वाटप करण्यात येत आहे.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अर्जुन दत्ताराम घारे यांच्या विशेष प्रयत्नातून हे शैक्षणिक साहित्य मनःशक्ती केंद्राकडून शाळेला प्राप्त होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे येथील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ही मोठी मदत ठरत असून त्यांच्या शैक्षणिक खर्चात मोठी बचत होत आहे. त्यामुळे गावातील सर्व पालकवर्ग शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अर्जुन घारे तसेच मनःशक्ती केंद्राचे मनःपूर्वक आभार व्यक्त करीत आहेत.सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता आयोजित वह्या वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी मनःशक्ती केंद्राच्या वतीने मनसाधक श्री. अजित पाफाळे, डॉ. सुहास गोसावी, श्रीमती प्रतिमा बोडस, श्रीमती संध्या खोत व श्री. नंदकिशोर खंडेलवाल यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.यानंतर डॉ. सुहास गोसावी यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार औषधोपचार केले. तसेच मनःशक्ती केंद्राच्या वतीने शाळेला प्रथमोपचार पेटी व प्रथमोपचारासाठी आवश्यक औषधे भेट स्वरूपात प्रदान करण्यात आली.त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक तसेच शिक्षकांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास गावातील पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच युवा नेतृत्व श्री. तानाजी घारे, श्री. विशाल घारे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. सुनील घारे यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे आदर्श पदवीधर शिक्षक श्री. संतोष भेगडे यांनी केले, तर कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी आदर्श उपशिक्षक श्री. श्रीप्रसाद गर्कळ यांनी पार पाडली. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री. भागवत झांबरे यांनी उपस्थित मान्यवरांचे व मनःशक्ती केंद्राचे मनःपूर्वक आभार मानले.सर्व विद्यार्थ्यांनी मनःशक्ती केंद्राच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व लाभदायी ठरला आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page