अंतर भारतीय बालग्राम या शाळेतील अनाथ मुलांना sgf लोणावळा गिल्ड तर्फे स्काऊट ड्रेस वाटप

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,(श्रावणी कामत)दिनांक १२/४/२०२४ रोजी महाराष्ट्र SGF तर्फे दान मिळालेले स्काऊट गाईड ड्रेस चे वाटप अंतर भारतीय बालग्राम भुशी गाव येथे करण्यात आले या कार्यक्रमाची सुरवात स्काऊट प्रार्थना ने करण्यात आली त्या नंतर SGF महाराष्ट्र चे माजी अध्यक्ष सुरेंद्र जी अग्रवाल यांची तब्बेत लवकरात लवकर बरी व्हावी या साठी मुलांनी आणि शिक्षकांनी व लोणावळा गिल्ड मेंबर यांनी ईश्वर त्यांना आरोग्य देवो अशी प्रार्थना केली. त्या नंतर कै. श्री संतोष तळपे यांच्या वाढदिवसा निम्मित 2 मिनिटासाठी मौन पाळले… यानंतर सौं रत्नाप्रभा गायकवाड यांनी मुलांना मार्गदर्शन केले.. त्या नंतर उपस्थित मुलींना संघाच्या वतीने स्काऊट गाईड ड्रेस वाटप करण्यात आले. ते पाहून मुली खूप खुश झाले आणि म्हणlल्या कि ड्रेस घातल्याने आह्माला अभिमानाने भरून येत आणि आह्मी इतरांन पेक्षा वेगळे दिसतो. या वेळी कार्यक्रमास लोणावळा गिल्ड च्या अध्यक्षा सौं रत्नप्रभा गायकवाड, सचिव हेमलता शर्मा, सदस्य सौं अंबिका गायकवाड, सौं श्रावणी कामत, सौं सुलभा खिरे तसेच अंतर भारतीय स्कूल चे मुख्यधापक डॉ.संदेश कदम,स्काऊट शिक्षक चव्हाण सर,गाईड शिक्षिका सोनिया कसबे,सह शिक्षक शितल गवळी,सीमा माजी,अतुल पाटील ,सुनील जाधव,रोहित अहेर अल्फिया शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page