मावळात एक लाखाहून अधिक महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ,आमदार शेळके यांची तहसील कार्यालयात बैठकीत माहिती



मावळ मराठा न्युज – मावळ,महायुती सरकारने महाराष्ट्रात महिला सबलिकरण संदर्भात एक पाऊल टाकून महिलांना आर्थिक दृष्ट्या सबल करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा जास्तीत जास्त माता-भगिनींना लाभ मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात केली.राज्यात सर्वत्र या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आणि ही योजना लोकप्रिय सुद्धा होत आहे. आपल्या मावळात देखील अ योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.विविध ठिकाणी नोंदणी केंद्रे उभारुन योजना प्रभावीपणे मावळ विधानसभेत राबविण्यात आली.नुकतीच वडगांव मावळ येथे तहसील कार्यालयात बैठक संपन्न झाली या बैठकीस मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, हवेलीचे तहसीलदार जयराज देशमुख, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, एकात्मिक बाल विकास अधिकारी विशाल कोतागडे, वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी प्रवीण निकम, देहू नगरपंचायत मुख्याधिकारी निवेदिता घाडगे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उप मुख्याधिकारी ममता राठोड, तसेच मावळ विधानसभेतील इतर अधिकारी उपस्थित होते. त्यामुळेच तालुक्यातून आतापर्यंत एक लाख तीन हजार १७८ भगिनी योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत,अशी माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील शेळके यांनी दिली. मावळ विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सद्यस्थिती व आढावा घेण्यासाठी मावळ तहसील कार्यालयात बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार सुनील शेळके होते.त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.




