अनंत चतुर्दशीला विविध पक्षांची स्वागतासाठी मांडलेली दुकानें आणि राजकीय समीकरणे






मावळ मराठा न्युज-लोणावळा,लोणावळ्यात नुकताच गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला.अनंत चतुर्दशी म्हणजेच बाप्पाचा विसर्जनाच्या दिवशी गणेश मंडळ आणि हजारो गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी सर्वच पक्षांनी छान दुकानें थाटली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वात आधी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाचे दुकानबद्दल बोलूयात. यात सत्ताधारी पक्षाचे मावळ चें आमदार सुनील शेळके यांना मानणारा म्हणजे त्यात त्यांचे कार्यकर्ते त्याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुसरे दुकान भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अनंता गायकवाड म्हणजे माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांचे नेतृत्व मानणारा कार्यकर्ता यांनी थाटले होते.बाजूला काँग्रेस पक्ष राजू गवळी अध्यक्ष असलेले तिसरे दुकान होते.त्याच शेजारी चोथे दुकान महाराष्ट्र नवनिर्माण सेना निखिलभोसले अध्यक्ष असलेल्या आपल्या राज ठाकरे यांच्या विचाराचे मनसैनिक यांचे होते,त्यांना देखील यावेळी लोणावळा नगरपरिषद निवडणूक लढवायची आहे.त्यामुळे त्यांनी देखील ऍक्टिव्ह होऊन कंबर कसली आहे.चौकात पाचवे दुकान लोणावळा नगरपरिषद यांचे होते.स्वतंत्र मंडप दरवर्षी असतोच.त्यात मुख्याधिकारी अशोक साबळे,अधिकारी आणि कर्मचारी तर होतेच परंतु या मंडपात भाजपा मध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या मागे आल्या होत्या, परंतु सध्या ना इकडे ना तिकडे गेलेले असे तठस्थ, स्वतः निवडून येण्याची क्षमता असलेले व हवा कुठे आहे? याची अजूनही वाट बघणारे दोन उमेदवार म्हणजे खंडाळाचे प्रमोद गायकवाड आणि तुंगार्लीचे राजू बच्चे हे पालिकेच्या दुकानात होते. आता येऊ या जयचंद चौक येथे थाटलेली तीन दुकानें यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे यात शरद पवार यांना मानणारा निष्ठावंत कार्यकर्ता चें दुकान ज्याची लोणावळा शहराची कमांड नासिरभाई शेख यांचे कडे आहे.दुसरे दुकान त्यांच्या समोरचं रेल्वे जिन्याजवळ सत्ताधारी एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्ष म्हणजे संजय भोईर त्याचे अध्यक्ष आहेत.तर तिसरे दुकान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे,वर्षानुवर्षे भंडारा असतो त्यांनी त्याच जागी गणेश भक्तांना जेवण देत भंडारा होता. आणि त्यांचे समोर बहुजन वंचित आघाडी चें दुकान होते.अश्या प्रकारे सर्व पक्षांनी दुकानें थाटली होती. यात दोन विशेष गोष्टी जाणवल्या त्या म्हणजे मावळचे राष्ट्रवादीचें आमदार सुनील शेळके यांचे सोबत सावली सारखे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले भाजपचे माजी गटनेते देविदास कडू सर्व दुकानाना भेट देत होते आमदारांनी भाजप च्या दुकानाला भेट दिली ज्यात माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव होत्या पण जयचंद चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या दुकानाला भेट दिली नाही हे विशेष. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे कोणतेही दुकान नव्हते पण आर पी आय चें प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी सर्व दुकानाना भेट दिली.सध्या वाघमारे एक वर्षापासून लोणावळ्यात आपली पुन्हा आपली चांगली प्रतिमा निर्माण केली आहे त्यामुळे त्यांचा सर्व दुकानावर आदर करण्यात आला. या गोष्टी बाप्पाच्या विसर्जन प्रसंगी थाटलेल्या दुकानातून आगामी काळात होणाऱ्या पालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे काय असतील? याचा अंदाज आला.



