लोणावळ्यातील जगविख्यात कैवल्यधाम योग संस्थेचे श्री सुबोध तिवारी यांनी घेतली राज्यपाल श्री जिष्णू देव वर्मा यांची मुंबईत लोकभवन येथे सदिच्छा भेट








मावळ मराठा न्युज – त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री, तेलंगणाचे माजी राज्यपाल आणि महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल सन्मानीय श्री जिष्णू देव वर्मा यांची नुकतीच लोणावळ्यातील जगविख्यात कैवल्यधाम योग संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांनी मुंबईत लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना कैवल्यधाम योग संस्थेचे काॅफी टेबल बुक देऊन सन्मानीत केले तसेच त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. कैवल्यधाम योग संस्थेतील गोवर्धनदास सक्सेरिया योग महाविद्यालय या वर्षी आपले प्लैटिनम ज्युबली ( 75 वर्ष ) साजरे करणार आहे त्या करीता श्री सुबोध तिवारी यांनी सम्मानीय राज्यपाल यांस प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. कैवल्यधाम संस्थेने नुकतीच आपली 100 वर्षे पूर्ण केली आहेत आणि यशस्वीरित्या पुढील वाटचाल चालू आहे



