वाय.सी.क्लासेस लोणावळा शिक्षकदिनी विद्यार्थ्यांनी अनुभवला शिक्षक होण्याचा आनंद







मावळ मराठा न्युज- लोणावळा,वाय.सी. क्लासेस मध्ये वर्षभर अनेक उपक्रम राबविले जातात त्यापैकी ५ सप्टेंबर हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती श्री सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी विद्यार्थी शिक्षक बनून शिक्षकाची भूमिका अनुभवण्याचा आनंद घेतात आणि हाच अनुभव वाय. सी.क्लासेसचे संचालक श्री एन व्ही दुडे सर,दिपेश सर व सुजाता आंबेकर मॅडम यांनी आपल्या विद्यार्थ्यांना देण्याचे ठरवले.
अशा वेळी कुमारी रोशनी येवले हिने मुख्याध्यापिकेची भूमिका योग्य तासिकेचे व वेळेचे नियोजन करून आपली भूमिका पार पाडली यावेळी कुमारी प्रार्थना दुडे,वैष्णवी गाढवे,अनिकेत विश्वकर्मा, राजकुमार पाटील,आचल मौर्य, सिद्धांत गायकवाड, जान्हवी थोरात तसेच बारावी सायन्स व कॉमर्सच्याही विद्यार्थ्यांनी शिकवण्याचा आनंद लुटला सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना उत्तम प्रतिसाद देऊन आपल्या वर्ग मित्रांचा आत्मविश्वास वाढवला शेवटी वाय. सी. क्लासेसचे संचालक श्री एन व्ही दुडे सर व दिपेश सर यांनी सर्व विद्यार्थी शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून उत्सव साजरा केला.



