आय पी एस अधिकारी,वेगळी त्यांची कार्यशैली नाव त्यांचे कार्तिक सत्य साई,लोणावळातील हॉटेलमध्ये अश्लील गाण्यांवर विवस्त्र नाचणाऱ्या ५३ जणांवर कारवाई


मावळ मराठा न्यूज:- लोणावळा,लोणावळा उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक आय पी एस सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदार कडून माहिती मिळाल्या वरून वलवन येथील वेईस्प्रिंग वुड या हॉटेल मध्ये काही इसम आणि महिला अश्लील गाण्यांवर साऊंड सिस्टीम ने मोठ्या आवाजात करून अश्लील चाळे करत विवस्त्र अवस्थेत अश्लील गाण्याच्या तालावर नाचत असल्याची माहिती मिळाल्यावर सत्य साई कार्तिक स्वतः पथकासह लोणावळा शहर पोलिस स्टेशनचे पोलीस यांना घेवून दिनांक १ फेब्रुवारी २०२३ बुधवार रोजी रात्री ११.४० मिनिटांनी अचानक छापा टाकला असता ४४ पुरुष आणि ९ महिला सदर हॉटेल च्या प्रांगणात विवस्त्र अश्लील चाळे करत नाचताना नियम व तरतुदींचे उल्लंघन करताना मिळून आलेत.या संधर्भात पोलीस कॉन्स्टेबल संदीप अजिनाथ बोराडे यांनी लोणावळा शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून साउंड सिस्टम जप्त करून ५३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत




