समर्थ जनहित फॉउंडेशन,स्वामी समर्थ शंकर चिले सेवा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कुसगाव बु येथे मोफत डोळे तपासणी शिबिराला प्रचंड प्रतिसाद

मावळ मराठा न्युज:- लोणावळा,समर्थ जनहित फॉउंडेशन स्वामी समर्थ शंकर चिले सेवा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ओळकाई देवी मंदिर कुसगाव बुद्रुक येथे मोफत डोळे तपासणी,चष्मा वाटप आणि मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनंचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ,समर्थ जनहित फाऊंडेशन च्या अध्यक्षा कीर्ती जाधव,उपाध्यक्षा ज्योती टोपे,खजिनदार संतोष गुरव,ऍड योगीता तांबे, कुसगाव च्या सरपंच अश्विनी गुंड,आधार फौंडेशन चे अध्यक्ष प्रकाश पाठारे,जेष्ठ नागरिक संघ लोणावळाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे,नामदेवराव डफळ, सामाजिक कार्यकर्ते राजेश भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिबिराला आजी माजी पंचायत समिती सदस्य,ग्रामपंचायतचे आजी माजी सदस्य,सरपंच, ओळकाई देवी मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवर यांचा हस्ते नवनिर्वाचित जनसंसद संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब चौधरी आणि अमित कांबळे यांचा लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनंचे वरिष्ठपोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे यांचे हस्ते ओळकाई देवी जेष्ठ नागरिक संघाच्या स्मरणीकेचे प्रकाशन धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिरात एकूण ३५० हुन अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला. डोळ्यांचे तज्ञ् डॉक्टर मोहिते यांनी ही जबाबदारी पार पाडली. यावेळी अनेक सामाजिक संस्था त्यांचे पदाधिकारी,प्रतिष्ठित नागरिक यांनी मोफत आरोग्य शिबिराला शुभेच्छा दिल्या.किशोर धुमाळ,बापूसाहेब पाटील,संतोष गुरव,नामदेव डफळ,पांडुरंग तिखे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमांची सुरुवात मृदुला पाटील,शिरस्कर मॅडम यांनी सानेगुरुजी यांची प्रार्थना म्हणत केली.शिबिराचे उदघाट्न जनसंसद चे पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी केले.यावेळी संस्थेचे सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page