खांदेशवासियांच्या मराठा समाज बांधवांचा वधू वर पालक परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

मावळ मराठा न्यूज:- पिंपरी(प्रतिनिधी) निगडी येथील खान्देश मराठा मंडळाच्या वतीने खान्देशी मराठा समाज बांधवांचा वधू वर पालक परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले यावेळी मंडळाचे अध्यक्ष मधुकर पगार, उपाध्यक्ष सयाजीराव पाटील, सचिव प्रदीप शिंदे, खजिनदार भास्कर पाटील, सहसचिव अनिल सावंत, हिशोबनीस जयवंत सिसोदे , संचालक मिलिंद पाटील, संजय पाटील, सुरेश पाटील, कृष्णराव अहिरराव आणि मार्गदर्शक कमिटीचे भगवान पाटील, संतोष पाटील, भिकनराव पाटील, माधव पवार. आणि हंबीरराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे मंडळाचे सचिव प्रदीप शिंदे यांनी प्रास्ताविक केले.मंडळाचे अध्यक्ष यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष बी डी पाटील यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जितेंद्र वाघ यांनी कार्यक्रमाला उद्देशून मार्गदर्शन केले. वधू वर यांचा परिचय पत्रक वाचन मिलिंद पाटील व जयवंत सिसोदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश भगवान पाटील यांनी केले. अनिल सावंत यांनी प्रमुख पाहुण्यांचे औक्षण व शिवाजी महाराजांची आरतीची नवी प्रथा चालू करण्यामध्ये विशेष सहकार्य केले.आणि कार्यक्रमाचे आभार एस आर पाटील यांनी केले.कार्यक्रमा दरम्यान मान्यवरांनी समाजात असलेल्या चालीरीतीमध्ये लग्नाच्या अगोदर जे प्री-वेडिंग शूटिंग केले जाते. आणि ज्यात नको गोष्टी लोकांना दाखविल्या जातात अशा लग्नांना समाजाने सार्वजनिक बहिष्कार टाकावा असे सुचविले.पालकांनी कर्ज काढून देखाव्यासाठी खूप मोठा लग्न करू नये त्या ऐवजी त्यात वाचलेला पैसा हा त्यांच्या पुढील संसारी गरजा भागवण्यासाठी उपयोगात आणावे असे सुचविले.कार्यक्रम समस्थ सर्वांनी भोजनाचा मनसोक्त आस्वाद घेत आलेल्या पालकांनी एकमेकांशी चर्चा केली. चर्चा करण्यासाठी पूरेशी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page