वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


मावळ मराठा न्यूज:- वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने ८ मार्च, २०२३ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वडगाव येथील न्यायालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले व याप्रसंगी उपस्थित सर्व महिला भगिनींचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अनेक वकील बंधु-भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वडगाव येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी जी देशमुख साहेब,न्यायाधीश आर एन चव्हाण साहेब, न्यायाधीश ए एस अग्रवाल, न्यायाधीश जी एस पाटील व न्यायाधीश एस आर बर्गे, अॅड सिताराम बवरे, अॅड एन एस दाभाडे, अॅड अशोक ढमाले, अॅड रंजनाताई भोसले, मा. अध्यक्ष अॅड धनंजय कोद्रे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व महिलाशक्तीचे महत्व कवितेमधून विशद केले. यावेळी उपस्थित महिलांकडून महिला सबलीकरण या विषयावर भारूडाचे देखील सादरीकरण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष अॅड दीपकजी चौधरी, उपाध्यक्ष अॅड सोमनाथ पवळे, उपाध्यक्षा अॅड मिनाक्षीताई ढोरे, सचिव अॅड मोनालीताई कुलकर्णी- शेलार, सचिव अॅड राम शहाणे सर, खजिनदार अॅड प्रिया पंडीत, सदस्या अॅड प्रणोती पिंगळे, अॅड साक्षी मोरे, अॅड रोहिणी मुथा, अॅड प्रियांका शिंदे, अॅड मोझेस बनसोडे, अॅड प्रदिप ढोकर, अॅड अक्षय रौंधळ, अॅड प्रतिक देशमुख, अॅड अविनाश शिंदे, अॅड सागर शेटे यांसह अनेक वकील बंधु- भगिनींनी विशेष प्रयत्न केले.



