*पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व खेड तालुका कुस्तीगीर तालीम संघातर्फे ९ ऑगस्ट २०२६ क्रांतीदिनी,हुतात्मा राजगुरू मुले व मुली बाल कुस्ती स्पर्धा*

मावळ मराठा न्युज -पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व खेड तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष , सचिव व पदाधिकारी यांच्याकडून स्वखर्चाने आयोजन,दिनांक ९ ऑगस्ट २०२६ क्रांतीदिन, हुतात्मा राजगुरू मुले व मुली बाल कुस्ती स्पर्धा . स्थळ — नक्षत्र मंगल कार्यालय इंडियन ऑइल पेट्रोल पंपा समोर आळंदी वडगांव रोड,खेड तालुका कुस्तीगीर तालीम संघाच्या अध्यक्ष , सचिव व सर्व पदाधिकाऱ्यांकडू दरवर्षी तीन कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाते त्यामध्ये १ ) हुतात्मा राजगुरू बाल कुस्ती स्पर्धा. २ ) महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धा. ३ ) खेड केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाते. खेड तालुक्यामधील कुस्तीचा जुना इतिहास पाहता कै.पै. बबनराव डावरे ऑलम्पिक वीर, कै.पै. हिरामण अण्णा बनकर महाराष्ट्र केसरी, पै. विकी बनकर महाराष्ट्र केसरी. पै.शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी, पै. बबनराव वहिले वस्ताद पै.दिनेश गुंडसर शिवछत्रपती पुरस्कार विजेते , पै.पांडुरंग बनकर,पै. साहेबराव राळे पै. दीपक डोंगरे पै. आदर्श गुंड, पै. नरहरी गावडे, पै. सागर गावडे पै. पंकज साबळे पै .अक्षय जगनाडे, पै. अक्षय करपे, पै. विशाल थोरवे, पै. अक्षय गावडे, व इतर अनेक असे खेड तालुक्यातील असंख्य माजी नामांकित पहिलवान आहेत. तीच खेड तालुक्यातील कुस्तीची परंपरा यापुढे जतन व कायम ठेवण्यासाठी अनेक लहान वयापासूनच पैलवान घडावेत व कुस्ती वाढावी यासाठी दरवर्षी हुतात्मा राजगुरू पै.मुल पै मुली बाल गट कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धा आणि खेड केसरी कुस्ती स्पर्धा यांचे आयोजन केले जात आहे. अशी माहिती पैलवान बाळासाहेब चौधरी कुमार केसरी उपाध्यक्ष पुणे जिल्हा,अध्यक्ष खेड तालुका कुस्तीगीर तालीम संघ यांनी मावळ मराठा न्यूजला दिली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page