उपतालुकाप्रमुख श्री प्रकाश पाठारे यांच्या नेतृत्वात लोणावळा आणि परिसरातील तरुणांचा खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश







मावळ मराठा न्युज,थेरगाव -शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास ठेवुन श्री देवेंद्र कुलकर्णी , अभिषेक दळवी , मयुर मानकर , मयुर शेजवल व सौरव निकम ह्या तरुणांचा नुकताच शिवसेनेत थेरगांव येथील खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या संपर्क कार्यालयात मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते पक्षप्रवेश उत्साहात पार पडला .या प्रसंगी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख श्री प्रकाश पाठारे , युवासेना लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे , युवासेनेचे सागर पाचर्णे , संकेत जाधव युवासेना उपशहर अधिकारी , कल्पेश तिखे वाहतुक सेना अध्यक्ष , प्रमोद जेधे ,दुर्वेश कडूदुर्वेश बोडके,प्रथमेश पाठारे आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



