जाहीर ई-कोटेशन सूचना क्र. १८ अंतर्गत घनकचरा संकलन व वाहतूक कामाची कोटेशन प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची मागणी






मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा नगरपरिषदेमार्फत घनकचरा संकलन व वाहतूक कामासाठी जाहीर ई-कोटेशन सूचना क्र. १८ प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर प्रक्रियेबाबत खालील बाबींना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची हरकत असून, प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी.अशी मागणी लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांचे कडे लेखी निवेदन देऊन केली आहे.त्यात१ . सदर स्वरूपाचे काम यापूर्वी नगरपरिषदेने स्वतः Estimate तयार करून, Technical Sanction घेऊन त्यानंतर निविदा प्रक्रियेद्वारे केलेले आहे. त्यामुळे यावेळी प्रथम कोटेशन मागवून, त्यानंतर Estimate व Technical Sanction घेऊन पुन्हा निविदा काढण्याची आवश्यकता काय आहे, हा प्रश्न निर्माण होतो.२ . सदर काम है घनकचरा संकलन व वाहतूक अर्थात आरोग्य, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित काम आहे. त्यामुळे संबंधित आरोग्य/स्वच्छता विभागाची प्रशासकीय भूमिका तसेच आरोग्य समितीच्या सभापतींची आवश्यक शिफारस/मान्यता घेण्यात आली आहे का, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे.३ . सदर ई-कोटेशन ०२/१०/२०२६ रोजी महात्मा गांधी जयंतीच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी e-procurement प्रणालीवर प्रकाशित करण्यात आले आहे.४ . विशेष म्हणजे, सार्वजनिक सुट्टीचा दिवस असतानाही आणि त्याच काळात निवडणूक आचारसंहिता लागू असताना सदर कोटेशन प्रकाशित करण्याची एवढी घाई करण्याची आवश्यकता काय होती? सदर काम इतके तातडीचे होते का की ते पुढील कामकाजाच्या दिवशी प्रकाशित करता आले नसते? सुट्टीचा दिवस, आचारसंहितेचा कालावधी आणि अत्यंत कमी कालावधीत कोटेशन मागविणे या सर्व बाबी एकत्रितपणे पाहता सदर प्रक्रियेच्या घाई, पारदर्शकता व प्रशासकीय औचित्याबाबत शंका निर्माण होतात.५ . प्रकाशन दिनांक ०२/१०/२०२६ व अंतिम दिनांक ०७/१०/२०२६ यामध्ये ०२ ऑक्टोबरची सार्वजनिक सुट्टी, ०३ ऑक्टोबर शनिवार व ०४ ऑक्टोबर रविवार असल्याने प्रत्यक्ष उपलब्ध कालावधी अत्यंत कमी राहतो. त्यामुळे पुरेशी स्पर्धा, पारदर्शकता व सर्व इच्छुकांना समान संधी मिळण्याबाबत प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ९३ (६) नुसार निविदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून निविदा स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किमान सात “clear days” उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. त्यामुळे सदर प्रक्रिया “कोटेशन” म्हणून राबविली जात असली तरी, त्यानंतर याच कामासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया प्रस्तावित असल्याने इतक्या कमी कालावधीत कोटेशन मागविणे हे स्पर्धात्मकता व पारदर्शकतेच्या दृष्टीने योग्य आहे का, याची तपासणी करणे आवश्यक आहे. ६ . सध्या निवडणूक आचारसंहिता लागू असताना केवळ सदर प्रक्रिया “कोटेशन” या नावाने असल्यामुळे ती आचारसंहितेच्या कक्षेबाहेर जाते असे गृहीत धरता येणार नाही. त्यामुळे सदर प्रक्रियेची आचारसंहितेनुसार वैधता व प्रशासकीय आवश्यकता तपासणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहितेसंबंधी स्वतंत्र आदेश उपलब्ध आहेत.वरील सर्व बाबींची कायदेशीर, प्रशासकीय व निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने तपासणी होईपर्यंत जाहीर ई-कोटेशन सूचना क्र. १८ अंतर्गत सदर प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी. तसेच सदर प्रक्रिया पुढे राबविण्यापूर्वी कामाचे प्रशासकीय स्वरूप,आरोग्य/स्वच्छता विभागाची भूमिका, आरोग्य समितीची आवश्यक कार्यवाही, Estimate-Technical Sanction-Tender ची आवश्यकता तसेच आचारसंहितेतील परवानगी/अनुमती या सर्व बाबींची स्पष्टता यावी अशी मागणी अध्यक्ष नासिरभाई शेख यांनी केली आहे.



