“संगीत म्हणजे रसिकांशी साधलेला संवाद” : डॉ. वैशाली जुंदरेकै. पद्माकर प्रधान स्मृती सुगम संगीत स्पर्धेचा सुवर्णमहोत्सवी समारंभ उत्साहात संपन्न








मावळ मराठा न्युज -तळेगाव दाभाडे दि. : “संगीत म्हणजे सूर, ताल आणि लय इतकंच नसून तो रसिकांशी साधलेला संवाद आहे. कलापिनी या संस्कारांच्या विद्यापीठात येऊन जीवन कौशल्य शिकण्याची संधी अजिबात सोडू नका.” असे मत डॉ. वैशाली जुंदरे यांनी व्यक्त केले. कलापिनी आयोजित, कै. पद्माकर प्रधान स्मृती सुगम संगीत स्पर्धेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या. हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. गेली पन्नास वर्षे संगीताची आवड जोपासत नवोदित गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी व्यासपीठावर या प्रसंगी लायनेस अमृता कुलकर्णी, पं. किरण परळीकर, प्रकाश प्रधान, अजित प्रधान, श्यामल प्रधान, शुभा प्रधान, अंजली सहस्रबुद्धे, अशोक बकरे, परीक्षक संतोष देशमुख, सदानंद गोखले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर शुभा प्रधान यांनी अभंग सादर केला. तसेच ‘जमेल तेव्हा जमेल त्याने’ हे गीत सादर करण्यात आले. अंजली सहस्रबुद्धे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले, तर स्पर्धाप्रमुख अशोक बकरे यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेची परंपरा, वाटचाल आणि सुवर्णमहोत्सवी वर्षाचे महत्त्व विशद केले.डॉ. अनंत परांजपे यांनी मनोगतातून स्पर्धक आणि पालक यांना प्रोत्साहन दिले. अमृता कुलकर्णी म्हणाल्या, “अशा स्पर्धांमुळे संगीताची परंपरा जतन होण्याबरोबरच नव्या पिढीतील कलाकारांना प्रोत्साहन मिळते.” यावेळी परीक्षकांनी स्पर्धेतील गायन, सादरीकरण आणि स्पर्धकांच्या संगीतविषयक तयारीविषयी आपली मते व्यक्त केली.प्रकाश प्रधान यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती प्रीत्यर्थ घेण्यात येणाऱ्या स्पर्धेच्या आयोजना बाबत कलापिनी परिवाराचे आभार मानले. कलापिनीच्या संगीत विभागाला त्यांच्या वतीने ढोलकी भेट म्हणून देण्यात आली. दीपाली गांगल, डॉ. वैशाली जुंदरे आणि भूषण जुंदरे यांनी कै. विद्या अंबिके आणि सुरेश अंबिके यांच्या स्मुर्ती प्रीत्यर्थ पुरस्कार देणार असल्याचे यावेळी जाहीर केले. संगीत सादरीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे गुणी वादक लक्ष्मीकांत धोंगडे, अनिरुद्ध जोशी, प्रदीप जोशी, चैतन्य लोवळेकर, चैतन्य कुरुंदवाड, कौस्तुभ ओक आणि योगीराज राजहंस यांचाही गौरव करण्यात आला.डॉ. विनया केसकर, अशोक बकरे, स्मिता दिवेकर आणि लीना परगी यांनी पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कलापिनीच्या कार्यकारिणी सदस्य आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – (प्रथम, द्वितीय आणि तृतीय)१ली २री मल्हार ढोरे (व्यंकटेश हायस्कूल), गौरी वैभव गुळवे (पैसा फंड प्राथ. शाळा), राजवर्धन दाभाडे (जैन इंग्लिश स्कूल)३री ते ४थी आयुष बनसुडे (जैन इंग्लिश स्कूल), जिनिशा गदिया (व्यंकटेश्वरा हायस्कूल), दित्या योगेश पन्हाळे (जैन इंग्लिश स्कूल)५वी ते – ७ वीखुशी लोहार (जैन इंग्लिश स्कूल), तेजस्वी मारुती मोहन (सरस्वती विद्या मंदिर), शांभवी सागर धर्माधिकारी (बालविकास विद्यालय)कै दादासाहेब चांदेकर स्मृती प्रतिभाशाली कलाकार – रेवा आनंद कशेळकर (एम्प्रॉस हायस्कूल)८वी ते -१० वीविवान रूपनवर (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल) , सृष्टी शंकर वीर (स्वामी विवेकानंद स्कूल), सृष्टी गणेश शिवणेकर (सरस्वती विद्यामंदिर)युवक गटतेजस जोशी, श्रावणी देशमुख, प्रज्ञा बेहरेप्रौढ गटकौस्तुभ ठोसर, अमृता झा, आनंद श्रीपाद कशेळकरज्येष्ठ गटप्रशांत देशपांडे, मेधा मिलिंद रानडे, दर्शना वाकणकरनाट्य संगीत (शालेय गट)खुशी लोहार , स्वरा नितीन माळी, विवान रूपनवर नाट्य संगीत (खुला गट)डॉ अश्विनी परांजपे, मेधा रानडे, सर्वज्ञा सोलापूरकर



