रोटरी क्लब ऑफ लोणावळाचा अभिनव उपक्रम,पीओपी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी स्वतंत्र हौद

मावळ मराठा न्युज – लोणावळा,आज-काल शाडूच्या माती ऐवजी पीओपीच्या मूर्ती बनविल्या जातात या स्वस्त व आकर्षक असतात म्हणून त्यास मागणीही भरपूर आहे परंतु हे प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात लवकर विरघळत नाही त्यामुळे विघटन होत नाही व या मूर्ती भगनावस्थेत विसर्जनाच्या ठिकाणी पहावयास मिळतात.
पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने पींओपी चे अमोनियम सल्फेट व कॅल्शियम कार्बोनेट मध्ये रूपांतर होण्यासाठी पाण्यात अमोनिअम बाय कार्बोनेट हे केमिकल ठराविक प्रमाणात मिसळून अम्रुत जल बनविले जाते.या अमृत जलात पीओपी मुर्ती चे लवकर विघटन होते.ते खत म्हणून वापरता येते व जलप्रदूषण कमी होते त्याकरता स्वतंत्र हौदाची व्यवस्था करण्यात आली आहे . त्याचप्रमाणे हे अमृत जल झाडांना व शेतीला खत म्हणून वापरता येते उरलेल्या लगद्याचे आपण वाळवून खडू ही बनवू शकतो
किंवा शेतात खत म्हणून वापरू शकतो.
रोटरी क्लब ऑफ लोणावळ्याने यावर्षी पीओपी मूर्ती विसर्जन करण्यास स्वतंत्र हौद महिला मंडळ शेजारी तयार केला आहे हे पहिलेच वर्ष असल्यामुळे लहान आकाराचा हौद आहे दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन या अमृत जल हौदात करण्यात आले तसेच पाच व सहाव्या दिवशी गौरींबरोबर विसर्जन होणाऱ्या गणेश मूर्तींचे विसर्जन या अमृत जलहवतात करण्यात आले
संध्याकाळी पाच वाजल्यापासून गणेश मूर्ती गणेश भक्तांनी विसर्जन करण्यास सुरुवात केली दोन तासात हौद मूर्तींनी भरून गेला पन्नास पेक्षा जास्त लहान पीओपी मुर्तींचे विसर्जन यावेळेस
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष विजया कल्याण प्रोजेक्ट डायरेक्टर नितीन कल्याण वास प्रेसिडेंट रवींद्र कुलकर्णी पुंडलिक वानखेडे आशिष मेहता नारायण हरवले तसेच सेक्रेटरी मुस्तफा कॉन्ट्रॅक्टर रोटेरियन तसलीम वगैरे उपस्थित होते असेच लोणावळा माझी अध्यक्षा सुरेखा जाधव व उपाध्यक्ष श्रीधर पुजारी हेही उपस्थित होते या अभिनव पर्यावरणपूर्वक प्रोजेक्ट बद्दल त्यांनी रोटरीचे कौतुक करून आभार मानले पुढील वर्षी मोठा हौद बांधून हा प्रोजेक्ट राबविण्यात येईल.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page