तळेगाव दाभाडे मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अमिन खान यांची अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बिनविरोध निवड








मावळ मराठा न्युज -वडगाव मावळ, ता. ३ सप्टेंबर :ज्येष्ठ पत्रकार अमिन खान यांची तळेगाव दाभाडे मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गुरुवारी रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख आणि विश्वस्त शरद पाबळे यांच्या हस्ते खान यांचा सत्कार करण्यात आला. मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत तालुका कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर तळेगाव दाभाडे आणि कामशेत मराठी पत्रकार संघाच्या नूतन अध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन ठाकर,विजय सुराणा, मुख्य सल्लागार ऍड संजय पाटील,उपाध्यक्ष प्रा. महादेव वाघमारे, कार्याध्यक्ष रेखा भेगडे, सचिव प्रा. योगेश घोडके यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.मावळ तालुक्यातील मराठी पत्रकार संघातील ज्येष्ठ अनुभवी पत्रकार, युवा पिढीतील माध्यमकर्मी आणि सक्षम महिला पत्रकार यांच्या एकजुटीतून येथील पत्रकार,पत्रकारिता आणि तालुक्यातील जनतेला न्याय देण्यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ठामपणे उभी असल्याचे देशमुख म्हणाले. पाबळे यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या गेल्या ८६ वर्षांतील देश पातळीवरील कार्य आणि व्याप्ती यांची माहिती दिली. सरकार दरबारी पत्रकारांच्या मागण्या, समस्या आणि उपाययोजना यावर एस. एम. देशमुख साहेबांनी केलेला पाठपुरावा आणि उपलब्धी यामुळे मराठी पत्रकारांचा आत्मविश्वास वाढला असल्याचे अमीन खान यांनी सांगितले.तळेगाव दाभाडे मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीत महाराष्ट्र लाईव्ह१ चे मुख्य संपादक तथा मालक दत्ता म्हाळसकर, दैनिक सकाळचे विजय सुराणा, सतर्क महाराष्ट्र चॅनेलच्या मुख्य संपादक रेखा भेगडे,लोकमत 18 चे अनिस शेख, लोकमत उर्से प्रतिनिधी प्रा. योगेश घोडके, मावळ टेक चॅनेलचे प्रमुख मयूर सातपुते, मावळ दर्पणचे संपादक गणेश भेगडे, मावळ वार्ताच्या प्रतिनिधी विद्या अडसूळ, पूनम निकम यांचा समावेश आहे.सचिन ठाकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविकात विजय सुराणा यांनी तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्याची माहिती दिली. प्रा. योगेश घोडके यांनी चालू वर्षातील नियोजित उपक्रमांची माहिती दिली. विद्या अडसूळ यांनी आभार मानले.



