महिला सभाना ७३ व्या घटना दुरुस्तीने संविधानिक दर्जा प्राप्त-अशोक सब्बन भारतीय जनसंसद







मावळ मराठा न्युज नेटवर्क -तलासरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मधिल महिलांना पंचायत राजमधिल ७३ व्या घटना दुरुस्तीवर आधारीत महिलांचे हक्क,अधिकार व सक्षमीकरणावर मार्गदर्शन करतांना भारतीय जनसंसदेचे अध्यक्ष मा.अशोक सब्बन बोलत होते.महिला सभाना ७३ व्या घटना दुरुस्तीने संविधानिक दर्जा प्राप्त झाला असून महिला सभेतील सर्व ठराव हे ग्रामसभेत पारीत करणे बंधनकारक आहे.ठराव नकारायचे असतील तर संयुक्तिक कारण कायद्यातील कलमासह लेखी उत्तर द्यावे लागते असे प्रतिपादन ग्रामसभा, महिलासभा,वार्डसभा,मासिक सभा,शाश्वत विकासाची भूमिका या विषयावर तलासरी तालुक्यातील महिला सक्षमीकरण होण्यासाठी आयोजित कार्यशाळेच्या कार्यक्रमात कायद्यावर सविस्तर मार्गदर्शन करतांना केले.या कार्यशाळे साठी तलासरी तालुक्यातील ग्रामपंचायती मधिल महिलांनी फार मोठा प्रतिसाद दिला.



